नगर : ट्रॅक्टरवरून पडून दोन मजुरांचा मृत्यू

नगर : ट्रॅक्टरवरून पडून दोन मजुरांचा मृत्यू
Published on
Updated on

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील अशोकनगर परिसरातील वळदगाव रोडवर सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरवर बसलेल्या दोन उसतोड मजूरांचा मृत्यू झाला. याच परिवारातील आणखी दोघे जखमी झाले आहेत.
अमोल बागुल व रविना बागुल असे मयत मजुरांची नावे आहेत. अपघातात मयत अमोल बागुल यांची पत्नी सपना बागुल व त्यांचे तान्हे बाळ हे देखील जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोलिस नाईक अहिरे, पोलिस शिपाई गायकवाड, कांबळे यांच्या पथकाने अपघातग्रस्तांना तात्काळ सहकार्य केले. जखमींवर शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचार चालू आहेत.

सदरचे उसतोडणी मजूर बाहेरगावचे आहेत. ते कोणत्या मुकादामाच्या टोळीत कामास आले होते, हे मात्र समजू शकले नाही. सदरचे कुटुंब हे आपल्या नातेवाईंकांकडे जात असल्याचे कळते. ट्रॅक्टर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर चारीत कोसळले. रात्रीची वेळ असल्याने हा प्रकार कोणाच्याही लवकर लक्षात आला नाही. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिसांकडून पुढील कारवाई चालू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news