

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात महिनाभरापूर्वीच हजर झालेले कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांची काल मंगळवारी नाशिक येथे बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी आता नाशिक जिल्हा परिषदेतून संजय शेवाळे यांची नगरला नियुक्ती झालेली आहे. नगर जिल्हा परिषदेच्या उत्तर बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता परदेशी यांची बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी संदीप सोनवणे यांची नियुक्ती झाली होती. नगरला हजर झाल्यानंतर त्यांनी अपूर्ण कामे, रखडलेल्या प्रशासकीय मान्यता, कामांचा दर्जा याबाबतही गांभीर्याने लक्ष दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी आचारसंहितेपूर्वीच उत्तरेतील सर्व प्रशासकीय मान्यता पूर्ण करून आपल्या कामाची कार्यपद्धती नगरकरांना दाखवून दिली होती. मात्र, काल त्यांनी नाशिक जिल्हा परिषदेत बदलीचे आदेश झाले आहेत. त्यांच्या जागी नाशिक जिल्हा परिषदेतून संजय शेवाळे यांची नगरला नियुक्ती झालेली आहे. लवकरच ते पदभार घेणार असल्याचे समजते.