नगर : कंटेनरमधून चार लाखांचे टायर लांबविले

file photo
file photo

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : कंटेनरमधून सुमारे 3 लाख 45 हजार 200 रुपयांचे नवीन टायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना नगर-मनमाड महामार्गावरील नांदगाव गावच्या शिवारात सोमवारी (दि.20) पहाटे घडली. याबाबत कंटेनर चालक ज्ञानेश्वर दत्तात्रय घोरपडे (रा.विजयनगर, ता.सिन्नर, जि.नाशिक) यांनी सोमवारी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घोरपडे हे त्यांच्या कंटेनरमधून (क्र. एम. एच. 43, बी. जे. 2218) चारचाकी वाहनाचे नवीन टायर घेऊन जात होते.

नगर-मनमाड महामार्गावर नांदगाव शिवारात पहाटेच्या सुमारास कंटेनर रस्त्याच्या कडेला थांबवून ते केबिनमध्ये झोपले. पहाटे 2.50 ते 2.20 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंटेनरच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून 3 लाख 13 हजार 200 रुपये किंमतीचे 18 टायर, तसेच 32 हजार रुपये किंमतीचे 2 टायर, असे 3 लाख 45 हजार 200 रूपये किंमतीचे 20 टायर चोरून नेले. चालक घोरपडे हे झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मालकाशी संपर्क साधून झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सोमवारी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news