नगर : पुढारी वृत्तसेवा
केरळ (थंबा) येथील डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथील शैक्षणिक सहलीसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. त्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक गुण मिळविणारे तिघे बालवैज्ञानिक इस्रो सहलीसाठी पात्र ठरले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरकेर यांच्या पुढाकारातून चार वर्षानंतर यंदा प्रथमच इस्त्रो सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी २१० विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय निवड चाचणी परीक्षा घेतली.
या परीक्षेच्या निकालातून पाचवी, सहावी आणि सातवी व आठवीच्या ४२ विद्यार्थ्यांना इखो सहलीची संधी मिळाली आहे. हे करणार इस्त्रो विमानवारी शिवतेज प्रदीप उगले (पिंपळगाव निपाणी, अकोले), अलोक ज्ञानेश्वर कवळे (बारगजेवस्ती, जामखेड), अमिता जालिंदर थोरात (जवळके, कोपरगाव), संस्कृती राजेंद्र शेलार (रुईगव्हाण, कर्जत), आर्यन राजेंद्र गडवे (कौडगाव, नगर),
स्वराज भास्कर सुंबे (हिवरे कोरडा, पारनेर), वेदांत अशोक गायकवाड (मीडसांगवी, पाथर्डी), अलनोव्हा शेख (गुहा, राहुरी), आरोही गोरख वाणी (नांदुर्खी, राहाता), मंथन महादेव कराड (बालमटाकळी, शेवगाव), ईश्वर सोमनाथ सोनवणे (बेल्हाळे, संगमनेर), आदिराज सुनील वाकडे (म्हातारपिंपरी, श्रीगोंदा), अविष्कार रवींद्र भगत (दिघी, श्रीरामपूर), समर्थ प्रदीप ढेरे (सौंदाळा, नेवासा), गौरी विष्णू वाकचौरे (कळस, अकोले),
तनुजा भारत सांगळे (सारोळा, जामखेड), अनन्या वाल्मिक बागल (ओगदी, कोपरगाव), आदित्य उत्तर दरेकर (बेनवडी, कर्जत), अंजली नीलेश परभाणे (बाबुर्डी घुमट, नगर), धनश्री साहित भडके ( पवारवाडी, पारनेर), आराध्या सदाशिव घुले (शेकटे, पाथर्डी,), अंजली शंकर शेजूळ (कात्रड, राहुरी) साक्षी आण्णा राशीनकर (धनगरवाडी, राहाता), प्रांजल राजेंद्र खेडकर (कोनोशी, शेवगाव), सत्यजित संजय देशमुख (वडगाव लांडगा, संगमनेर), कार्तिक विठ्ठल दरेकर (हिरडगाव, श्रीगोंदा),
शंतनू अजित कणसे (गोंडेगाव, श्रीरामपूर), राजवर्धन मच्छिंद्र आठरे (कौठे, नेवासा), सुमित संग्राम वैद्य (सुगाव, अकोले), यश महादेव भोंडवे (घोडेगाव, नेवासा), गीता दशरथ जोरवार (ओगदी, कोपरगाव), अनुष्का परसराम दळवी (मिरजगाव, कर्जत), भक्ती अशोक परभणे, (बाबुर्डी घुमट, नगर), साई ऋषिकेश पुजारी (पिंपरी जेलसेन, पारनेर), साक्षी बाळासाहेब निमसे (मढी, पाथर्डी),
अरमान बादशहा शेख (कात्रड, राहुरी), आर्याही गोरक्ष सांगळे (चांगदेवनगर, राहाता), कल्याणी अशोक गारपगारे (वरूर, शेवगाव), स्नेहल हरिश्चंद्र मोरे (पिंपळगाव कॉझीरा, संगमनेर), श्रेया रामदास बोंबले, (रूईखेल, श्रीगोंदा), फातेमा सय्यद (बेलापूर, श्रीरामपूर), आदित्य गणेश लोणारे (वडाळा बहिरोबा, नेवासा).
झेडपीच्या शाळांना सायन्स पार्क उभारले जात आहेत. मिशन आरंभमधून विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे. गेल्या चार ते पाच वर्षापासून बंद असलेली इखोची सहल देखील सीईओंनी पुढाकार घेऊन सुरू केली. त्यामुळे आता एक पालक म्हणून झेडपीच्या शाळांचा अभिमान वाटत आहे.
विलासराव ढोकणे, उंबरे