

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: शहर पोलिसांची दहशत संपल्याने सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच वेळी शहरात दुचाकी चोरट्यांच्या एकापेक्षा अधिक टोळ्या कार्यरत आहे. दुचाकी चोरीच्या घटनांममुळे नागरिक भयभित झाले असून शहर पोलिस ठाण्यात रात्री दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. अज्ञात चोरट्यांनी चोरलेल्या दुचाकीमध्ये एका बुलेटचा समावेश आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळलेल्या माहीतीनुसार शहरातील ताजणे मळा येथून हबीब अब्दुल करीम तांबोळी या किराणा व्यावसायिकाची सुमारे 50 हजार रुपये किमतीची क्लासिक कंपनीची बुलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेली. सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार निदर्शनास आला. या संदर्भात मंगळवारी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस दुचाकी चोरांचा शोध घेत आहे. सततच्या गुन्हेगारीमुळे मात्र नागरिक त्रस्त झाले आहे.
दुसर्यात घटनेत अज्ञात चोरट्याने ट्रॅक्टरची चोरी केल्याची घटना तालुक्यातील जोर्वे येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, जोर्वे येथील अशोक संपतराव थोरात यांनी चार वर्षांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच लाल रंगाचा ट्रॅक्टर नं. एम. एच. 17 बीएक्स 1081 ह विकत घेतला होता. दि 19 मे रोजी ट्रॅक्टर हा त्यांनी आपल्या राहते घरासमोर लावलेला होता. अज्ञात चोरट्याने रात्री सदर ट्रॅक्टर चोरून नेला आहे. थोरात यांचा मुलगा सुनील थोरात याच्या हे सकाळी लक्षात आले. आजूबाजूच्या परिसरात त्यांनी ट्रॅक्टरचा शोध घेतला. मात्र ट्रॅक्टर मिळून आला नाही. याबाबत अशोक थोरात यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.