

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : 'माझ्या मामाच्या मुली सोबत बोलत जाऊ नको', असे म्हणाल्याचा राग आल्याने चार जणांनी मिळून नंदिनी सडमाके या तरूणीला मारहाण केल्याची घटना तांदुळवाडी येथे घडली. या घटनेत नंदिनी सडमाके ही तरुणी जखमी झाल्याने तिच्यावर श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नंदीनी अरुण सडमाके (रा. तांदुळवाडी, ता. राहुरी) ही तरूणी राहुरी तालूक्यातील तांदूळवाडी येथे तीच्या कुटुंबासह राहत असून आरोपी हे तिच्या शेजारीच राहत आहेत. नंदिनी सडमाके ही घरी असताना घरासमोर आरोपी कन्हैय्या कन्नाके हा उभा होता. त्यावेळी नंदिनी त्याला म्हणाली की, तू माझ्या मामाच्या मुली सोबत बोलत जावू नकोस. असे म्हणाल्याचा त्याला राग आल्याने त्याने इतर आरोपींना बोलावून घेतले.
सर्व आरोपी नंदिनी हिला शिवीगाळ करू लागले. तेव्हा नंदिनीचा भाऊ गोविंद हा आरोपींना म्हणाला की, 'तुम्ही माझ्या बहीणीला शिव्या देवु नका' तेव्हा आरोपींनी नंदिनी अरूण सडमाके व तीचा भाऊ गोविंद या दोघांना लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच धमकी दिली. या घटनेत नंदिनी ही जखमी झाल्याने तीच्यावर श्रीरामपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने पोलिसा समक्ष दिलेल्या जबाबावरून आरोपी कन्हैया सुर्या कन्नाके, युवराज विशाल कन्नाके, अजय सुर्या कन्नाके, रवि हरी कन्नाके सर्व राहणार तांदूळवाडी (ता. राहुरी) या चार जणांवर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा :