जवळा : पुलाचे काम कासवगतीने ! आतापर्यंत 35 टक्केही काम नाही

जवळा : पुलाचे काम कासवगतीने ! आतापर्यंत 35 टक्केही काम नाही

जवळा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  येथे गेल्या दिड वर्षापासून सुरू असलेल्या सिद्धेश्वर ओढ्यावरील पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. यामुळे अनेक वाहनचालकांना दळणवळणाची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे कामात दिरंगाई न करता ठेकेदाराने लवकरात लवकर काम मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. एका दुचाकीचालकाच्या दंडात गज घुसल्याने तो जखमी झाल होत, तसेच अनेक जणही जखमी झालेत. शासनाने मंजूर केलेल्या सुमारे तीन कोटी खर्चाचे काम गेल्यावर्षी आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते मोठ्या धूमधडाक्यात झाले होते.

नेहमी ओढ्यात अडचणीचा रस्ता असल्याने आता पुल झाल्यावर ओढ्यावरून प्रवास करताना त्रास होणार नाही, रस्ता लवकर सुकर होईल, असे वाटले होते; परंतु लोकांचा हिरमोड झाला आहे. या अर्धवट रस्त्यावरून जाताना मनस्थाप व डोकेदुखी वाढली आहे. गेल्या सव्वा-दिड वर्षापासून संथ गतीने काम चालू असून, हे काम ठेकेदार नक्की का? रखडवतोय याची दखल ना प्रशासन घेतय ना जनप्रतिनिधी. तालुक्याला जोडणारा हा परिसरातील हा एकमेव जास्त वर्दळीचा रस्ता आहे. ठेकेदाराने काम चालू असलेल्या धोकादायक बाजूने बॅरिगेट्स, साईड बांबू लावणे गरजेचे असताना, तसे कोणतेच सुरक्षेच्या दृष्टीने केलेले दिसत नाही. त्यामुळे रात्री मोठा अपघात होऊन दुर्घटना घडू शकते. हा रस्ता कडेलाच पुलाचे पिलरचे खोलवर साधारण 15 ते 20 फूट खोल खड्डे आहेत. यात एखाद्याचा जीव गेला तर त्यास जबाबदार कोण? असा सवाल नागरिक करत आहेत. सुमारे सव्वा वर्ष उलटूनही अर्धे ही काम पूर्ण झालेले नाही, तरी लोकांची होणारी गैरसोय संबंधितांनी त्वरित लक्ष घालून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

दुचाकी चालकाच्या दंडात गज घुसला
सोमवारी (दि.7) सकाळी दहाच्या दरम्यान अर्जुन सालके व त्यांच्या दुचाकीवर वृद्ध भगवान पागिरे गावातील काम आटोपून या पुला जवळून जाताना तेथील कामगारांच्या हलगर्जी पणामुळे कामगार पूलाच्या कामासाठी रस्त्यावर गज तोडत होता. त्यातील गज तोडताना जवळून चाललेल्या अर्जुन सालके यांच्या दंडात घुसला. यामुळे ते जखमी झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news