टाकळीभान गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं

टाकळीभान गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा :  निवडणुकीपुरते राजकारण व इतरवेळी 'समाजकारण' अशी आदर्शगाव म्हणून ओळख असलेल्या टाकळीभानची ओळख आदर्शगाव म्हणून पुसत चालली आहे. गावाचे नाव खराब झाले आहे. आज टाकळीभान गावाची वाटचाल पुर्णपणे भरकटली असल्याने 'गाव तसे चांगले, पण वेशीला टांगले' असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.  गावची ग्रामपंचायत कोर्टात, टाकळीभान विविध कार्यकारी सेवा सोसायटी कोर्टात असून आता तलाठी कार्यालयही वादाच्या भोवर्‍यात आडकले आहे. येथे तलाठी व मंडाधिकारी कार्यालय असून ग्रामस्थांना सातबारा उतारा, रहिवासी दाखला तसेच उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी माळवाडगावला जावे लागत आहे. माळवाडगावला जावे लागते याचे दुःख नाही. मात्र आपल्या गावात तलाठी कार्यालय, मंडळाधिकारी कार्यलय असताना दुसर्‍या गावात जावं लागतं, याचं दुःख आणि खेद होत असल्याची प्रतीक्रिया सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष राहुल पटारे व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

मध्यंतरी निवेदनाद्वारे तलाठी भाऊसाहेबांना निलंबीत करण्याची मागणी करण्यात आली. तलाठी हिवाळे यांना निलंबीत करण्यात आले. दुसरे तलाठी आले मात्र त्यांनाही रोज निवेदन दिली जात आहेत. त्यामुळे त्यांनी टाकळीभान मधून कारभार न पाहता माळवाडगाव येथील कार्यालयातून टाकळीभान ग्रामस्थांना सातबारा उतारे, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखला दिला जात आहे. भविष्यात श्रीरामपूर जिल्हा झाला तर आपले टाकळीभान गाव तालुक्याचे ठिकाण होईल, असे आपण स्वप्न रंगवित आहोत. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच दिसून येत आहे. आज नविन तलाठी गावात यायला तयार नाही. शासकीय अधिकारी आपल्या गावात यायला घाबरतात गाव अती राजकारणामुळे अतिसंवेदनशील बनले आहे.

टाकळीभान गावाचं गावपण हरवलं आहे. हे सर्व अती राजकारणाचा परिणाम आहे.  गैरसमजातून जाती -जातीत तेढ निर्माण होत आहे. याचा थेट परिणाम सर्व जाती, धर्मातील व सर्वसामान्य घटकावर होताना दिसत आहे. शेतकरी, शेतमजूर व्यावसायिक, व्यापारी, शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी व त्यांचे पालक या सर्वांची गैरसोय होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांचे आदर्श आणि शिकवणी विसर गावाला पडलेला असल्याचे दिसत आहे. महापुरुषांच्या नुसत्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजर्‍या करून काहीच होणार नाही तर त्यांचा आदर्श व शिकवण आचरणात आणण्याची आज गावाला गरज आहे. एकेकाळी टाकळीभान आदर्श गाव म्हणून ओळख होती. मात्र आज आदर्श गावाची ओळख पुर्णपणे पुसली आहे. आज गावाची परिस्थिती भयावह झाली असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

आदर्श गावाची ओळख पुसली

पुरुषांच्या नुसत्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजर्‍या करून काहीच होणार नाही तर त्यांचा आदर्श व शिकवण आचरणात आणण्याची आज गावाला गरज आहे. एकेकाळी टाकळीभान आदर्श गाव म्हणून ओळख होती. मात्र आज आदर्श गावाची ओळख पूर्णपणे पुसली आहे. आज गावाची परिस्थिती भयावह झाली असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

logo
Pudhari News
pudhari.news