राहुरीत सदस्यांसाठी 226 उमेदवार रिंगणात ; 10 गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी

राहुरीत सदस्यांसाठी 226 उमेदवार रिंगणात ; 10 गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी
Published on
Updated on

राहुरी :  पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. ब्राम्हणगाव भांड ग्रामपंचायतीने बिनविरोधाच्या दिशेने पाऊले टाकत लोकनियुक्त सरपंच बिनविरोध करण्यात यश मिळविले. एका सरपंचासह 20 जणांना विरोध नसल्याने सदस्यपदाची लॉटरी लागली आहे. 10 गावांमध्ये 32 जण सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बाधूंन उभे ठाकले आहे. तर सदस्यपद मिळविण्यासाठी 226 उमेदवार लढत देणार आहेत. सरपंच पदासाठी इच्छूक असणार्‍या 53 जणांनी तर सदस्यपदासाठी इच्छूक असणर्‍या 238 जणांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली.

राहुरी तालुक्यातील आरडगाव ग्रामपंचायतीमध्ये 18 जणांनी सरपंच पदासाठी तर 70 उमेदवारांनी सदस्य पद मिळावे, अशी इच्छा व्यक्त करीत नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. काल 7 डिसेंबर रोजी माघारीच्या दिवशी 15 सरपंचपदावरील तर 41 सदस्य पदासाठी इच्छा व्यक्त करणार्‍यांनी माघार घेतली. आरडगाव ग्रामपंचायतीची सरपंच पदासाठी तिरंगी लढत होणार असून सदस्य पदासाठी 29 उमेदवार भिडणार आहेत. प्रवरा पट्ट्यातील लक्षवेधी असणारे सोनगाव ग्रामपंचायतीसाठीही चुरसदार लढत दिसून येत आहे. सरपंच पदासाठी भाजप व राष्ट्रवादीमध्ये दुरंगी लढत आहे.

18 उमेदवार एकमेकांविरोधात भिडणार असून दोघांना बिनविरोध सदस्यपदाची लॉटरी लागली आहे. यासह कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीमध्ये तब्बल 7 उमेदवार सरपंचपदावर दावा ठोकून आहेत. राजकीय नेत्यांनी मोठे प्रयत्न करूनही 7 अर्ज सरपंच पदासाठी तंबू ठोकून आहेत. तर सदस्यपद मिळविण्यासाठी 35 उमेदवार रिंगणात असून एक जागा बिनविरोध निवड झाली आहे. केंदळ खुर्द ग्रामपंचायतीमध्ये 9 सदस्य बिनविरोध निवडण्यात यश आले. परंतु लोकनियुक्त सरपंच होण्यासाठी दोघे जण रिंगणात आहे.

संत महिपती महाराजांच्या पावनभुमीत ग्रामंपचातयीमध्ये सत्ता मिळविण्यासाठी सरपंच पदासााठी तिरंगी लढत होत आहे. 19 जण सद्स्य पदासाठी रिंगणात असून दोन जागा बिनविरोध झालेल्या आहेत. तुळापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी दुरंगी लढत असून 12 उमेदवार सदस्यपदासाठी लढत देत असताना एक जागेवर बिनविरोध सदस्य निवड झाली आहे. कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीमध्ये 7 जण सरपंचपदासाठी हळद लावून बोहल्यावर चढणार असून 35 उमेदवार सदस्यपदासाठी रिंगणात आहेत. 1 जागा बिनविरोध झाली आहे.
खडांबे खुर्द ग्रामपंचायतीच्या लढतीमध्ये सरपंच होण्यासाठी तिरंगी लढत आहे.

तर सदस्य पदासाठी 27 उमेदवार रिंगणात आहे. कोंढवड ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी तिरंगी लढत असून 22 उमेदवार सदस्यपदासाठी एकमेकांसाठी भिडणार आहे. मांजरी ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत असून 22 सदस्यपदासाठभ उभे ठाकलेले आहे. ब्राम्हणगाव भांड बिनविरोधाच्या दिशेने पाऊल टाकत असताना तेथे सविता राजेंद्र पवार यांनी सरपंच पद बिनविरोध मिळविले. 5 सदस्य बिनविरोध झाले असून दोन जागेसाठी चार जण रिंगणात आहे.

सर्वांचे लक्ष लागलेल्या मानोरी ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक घडामोडी घडल्या. माजी लोकनियुक्त सरपंच आब्बासभाई दयावान यांना शह देण्यासाठी मातब्बर विरोधक असलेले विखे व तनपुरे गटाने हातमिळवणी केली आहे. मानोरी गावामध्ये सरपंच पदासाठी चार जण रिंगणात असून 38 उमेदवार रिंगणात उभे ठाकलेेले आहे. तनपुरे-विखे गटाने एकत्र येत मनोरीतून उभे असलेल्या दयावान यांच्या पराभवासासाठी शेवटच्या टप्यात एकी केली. परिणामी दोन्ही गटातील इच्छुकांना माघार घेण्याचे दडपण निर्माण केले. परंतु अनेकांनी अर्ज माघार घेतले नसल्याने नाराजींचा लाभ नेमका कोणाला होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मानोरीत राष्ट्रवादीने दिली भाजपला सरपंचपदाला साथ

सर्वत्र भाजपला शह देण्यासाठी काँगे्रस, राष्ट्रवादी व इतर पक्ष रणनिती आखत आहेत. परंतु मानोरी गावामध्ये राष्ट्रवादीने सरपंचपदासाठी भापला पाठिंबा दिल्याने तालुक्यात मोठी चर्चा रंगली आहे. दयावान यांच्या पराभवासाठी भाजप-राष्ट्रवादीची हातमिळवणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news