नगर : मोलकरणीने मालकाच्या घरामध्येच मारला डल्ला

नगर : मोलकरणीने मालकाच्या घरामध्येच मारला डल्ला

पाथर्डी तालुका (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : घरकाम करणार्‍या महिलेने मालकाच्या घरी डल्ला मारत साडेचार तोळे सोन्याचे दागिने चोरले. मात्र, पोलिस खाक्या दाखवित चोरी गेलेले सोने काही तासातच मोलकरणीकडून हस्तगत करीत, पोलिसांनी तिला अटक केली आहे. लंका संतोष शिरसाठ (रा.हनुमान टाकळी, ता.पाथर्डी) असे या घरकाम करणार्‍या महिलेचे नाव आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथील सेवानिवृत्त महिला अधिकारी सुभद्रा नवनाथ बर्डे यांच्या घरी घडली. सुभद्रा बर्डे या त्यांचे पती नवनाथ व मुलगा गणेश यांच्यासह गावात राहत असून, त्यांनी शेती व घरकामासाठी गेल्या तीन महिन्यांपासून गावातील लंका शिरसाठ हिला कामाला ठेवले होते.

दि.5 जून रोजी दुपारी सुभद्रा बर्डे यांनी त्यांचे वापरातील चार तोळ्याचे सोन्याचे गंठण, अर्धा तोळा सोन्याची अंगठी, असे 2 लाख 70 हजारांचे दागिने काढून बेडरूममधील कपाटात ठेवले होते. दुसर्‍या दिवशी सुभद्रा यांना कपाटातील दागिने आढळून आले नाहीत. त्यांनी लंका शिरसाट हिच्याकडे चौकशी केली असता, तिने उडवाउडवीचे उत्तरे दिले. त्यामुळे सुभद्रा बर्डे यांनी तात्काळ पाथर्डी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक निरीक्षक रामेश्वर कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अनिल बडे, अमोल कर्डिले, एकनाथ बुधवंत, राजेंद्र बडे, मनिषा धाने, मनिषा वारे यांनी लंका शिरसाठ हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच तिने चोरी केलेले 2 लाख 70 हजारांचे दागिने काढून दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news