Monica Rajale : मोदींशिवाय देशाला पर्याय नाही : आमदार मोनिका राजळे

Monica Rajale : मोदींशिवाय देशाला पर्याय नाही : आमदार मोनिका राजळे

मढी : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर सर्वसामान्य मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवित, चार पैकी तीन राज्यांत मोठ्या बहुमताने सत्ता भाजपाच्या हाती दिली. मोदींशिवाय देशाला पर्याय नाही. पंतप्रधानांवर टीका करणार्‍यांना मतदारांनी मतपेटीतून उत्तर दिले आहे. आगामी काळात होणार्‍या सर्व निवडणुकांमध्ये मतदारांचा असाच कौल राहील, असा विश्वास आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केला. पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे, मढी येथे विविध रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मढीचे माजी सरपंच भगवान मरकड, तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, रवींद्र वायकर, सचिन वायकर, महादेव जायभाय, रामकिसन काकडे, बबन मरकड, उपसरपंच रवींद्र आरोळे, भाऊसाहेब मरकड, नवनाथ मरकड, निवडुंगेचे सरपंच वैभव देशमुख, उद्धव ससे, जनार्दन मरकड, शामराव मरकड, विष्णू मरकड, शंकर पाखरे, प्रदीप पाखरे, शैलेंद्र बोंदार्डे, गणेश मरकड, चंद्रभान पाखरे, विठ्ठल मरकड, सुखदेव मरकड, हरिश्चंद्र मरकड, दादासाहेब मरकड आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

मार्च 2023 अर्थसंकल्प निधीतून निवडुंगे ते मढी रस्त्यासाठी 80 लाख रूपये, तर मढी ते पाथर्डी रस्त्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी आमदार मोनिका राजळे यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मढी, मायंबा, वृद्धेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे. आमदार राजळे म्हणाल्या, अवकाळी पावसाने दुष्काळी तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला. राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून, त्यामध्ये पाथर्डी तालुक्याचा समावेश आहे.

तालुक्यातील कोरडगाव मंडळाचा सुद्धा लवकरच समावेश होणार आहे. दोन्ही सरकारच्या माध्यमातून तालुक्याला भरीव निधी मिळत असल्याने विकासकामांची गती वाढली आहे. मढी येथे पाझर तलावासाठी 61 लाख, सामाजिक न्याय भवनसाठी 10 लाख, तर स्मशानभूमीसाठी 7 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांनी यासाठी जिल्हा नियोजन मंडळामार्फत सहकार्य केले. सर्वांनी भाजपवर प्रेम व विश्वास व्यक्त केल्याने पक्षाच्या माध्यमातून विकासकामांची गती वाढविता आली. आगामी काळात सर्वत्र अशीच एकजूट कार्यकर्त्यांनी दाखवून विकासकामांना साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.

माजी सरपंच भगवान मरकड म्हणाले, आमदार मोनिका राजळे यांचे गेल्या आठ-दहा वर्षांतील काम पाथर्डी- शेवगाव मतदारसंघात विकास कामाचा मानबिंदू ठरत असून, राज्यासह जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी स्वतःचा ठसा उमटविला आहे.
राजळेंचे नेतृत्व शांत, संयमी व विकासाची दृष्टी असलेली असून, तालुक्याने अशा नेतृत्वामागे ताकद उभी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मढी-तिसगाव रस्ता होणार चकाचक
मढी ते पाथर्डी, निवडुंगे ते मढी या रस्त्यांबरोबर प्रादेशिक पर्यटनमधून तिसगाव ते मढी या रस्त्यासाठी 3 कोटी 40 लाख रूपये निधी मंजूर झाला आहे. आगामी काळात मढीकडे येणारे सर्व रस्ते चकाचक होतील, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news