पर्यटनाच्या नकाशावर नगर यायला हवे : जयंत येलूलकर

पर्यटनाच्या नकाशावर नगर यायला हवे : जयंत येलूलकर
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : नगर शहराला ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमी असून हे शहर यापूर्वीच पर्यटन नकाशावर यायला हवे होते. इतक्या समृद्ध वास्तू येथे आहेत. येथील चविष्ट खाद्य संस्कृती देखील पर्यटकाना नक्कीच प्रेमात पाडेल. आज जगात पर्यटनाला मोठे महत्त्व आले असून आमचे अहमदनगर शहर पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. इतिहासात हे शहर देशातील एक समृद्ध शहर होते. पर्यटकांचे माथेरानप्रमाणे नगरकर देखील तेवढ्याच उत्साहात स्वागत करतील, असे प्रतिपादन रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी केले.

अहमदनगर येथील रसिक ग्रुप व माथेरान प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नातून या शहराच्या पर्यटन वाढीसाठी अहमदनगर – माथेरान पर्यटन मैत्रीच्या उपक्रमास आज माथेरान येथे सुरुवात झाली. अहमदनगर येथील रसिक ग्रुप व माथेरान प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नातून या शहराच्या पर्यटन वाढीसाठी अहमदनगर – माथेरान पर्यटन मैत्रीच्या उपक्रमास आज माथेरान येथे प्रारंभ झाला.

यावेळी माथेरान नगर परिषदेचे नगरसेवक व उद्योजक प्रसाद सावंत, रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, कुलदीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.येलूलकर म्हणाले पंचशताब्दीचा वारसा लाभलेले अहमदनगर शहर धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनाचे शहर म्हणून जगाच्या नकाशावर यावे यासाठी नगर येथील रसिक ग्रुपच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या उपक्रमास माथेरान शहरात उत्साहात सुरुवात झाली.

यापर्यटन मैत्री उपक्रमाद्वारे प्रथमच एका शहरात संतांची भूमी असलेल्या नगर शहराची माहिती असलेले सचित्र मोठे फलक पर्यटकांच्या माहितीसाठी लावले गेले. यानिमित्ताने नगरला भेट देणारे पर्यटक ऐतिहासिक, धार्मिक वास्तूंच्या भेटी बरोबरच बाजारपेठेत देखील फेरफटका मारतील. शहराच्या पर्यटन, रोजगार विकासाच्या रसिक ग्रुपच्या या प्रयत्नास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ, आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हा प्रशासन, महापालिका नक्कीच सहकार्य करून पर्यटकांना सोयी सुविधा पुरवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news