नगर : सत्ताधार्‍यांसमोर नवख्यांचे आव्हान ; शहर सहकारी बँकेसाठी 33 उमेदवारी अर्ज

नगर : सत्ताधार्‍यांसमोर नवख्यांचे आव्हान ;  शहर सहकारी बँकेसाठी 33 उमेदवारी अर्ज
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहर सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज अखेर 15 जागांसाठी 33 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सत्ताधार्‍यांनी एका गटाने येऊन अर्ज भरले. त्यांच्याविरोधात नव्यांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे निवडणूक दुरंगी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. मात्र, अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची 2020 मध्ये मुदत संपली होती. कोरोनामुळे राज्य सरकारने सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. यामध्ये या बँकेचा देखील समावेश होता. उपनिबंधक गणेश पुरी यांनी या बँकेच्या संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यात सर्वसाधारणसाठी 10 जागा, अनुसूचित जाती-जमातीसाठी एक, महिलांसाठी दोन, ओबीसीसाठी एक तर भटक्या विमुक्तांसाठी एक जागा आहे. या निवडणुकीत 12 हजार 110 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

2 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला होता. आज (दि.9) अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस होता. आज अखेर 33 उमेदवारी अर्ज दाखल झाले. उद्या 10 नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 11 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 11 डिसेंबरला मतदान होणार असून, 12 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये बँकेच्या विद्यमान संचालकांचाही समावेश आहे. तर, सत्ताधार्‍यांनी सुभाष गुंदेचा व सीए गिरीष घैसास यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये अनेक नवख्या चेहर्‍यांना संधी दिली आहे. त्यात राष्ट्रवादीचे प्रा. माणिक विधाते, रेश्मा आठरे यांच्यासह जयंत येलूलकर, स्वामी कांबळे आदींचा समावेश आहे. तर, विरोधी गटामध्येही नवखे चेहरे असून, त्यामुळे निवडणुकीत रंगत भरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, भूषण अनभुले, सीए गिरीष घैसास, निखील नहार, शिवाजी कदम, विजयकुमार भंडारी, संजय घुले, गणेश विधे, दिलीप अडगटला यांनी दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत.

सर्वसाधारण प्रवर्ग
संजय घुले, सुजित बेडेकर, शिवाजी कदम, अशोक कानडे, सुभाष गुदेंचा, डॉ. विजयकुमार भंडारी, जयंत येलूलकर, निखील नहार, माणिक विधाते, सीए गिरीष घैसास, भूषण अनभुले, दिलीप अडगटला, अनिस चुडीवाला, गणेश विधे, रवींद्र औटी.

इतर मागासवर्गीय प्रवर्गः
संजय घुले, स्वप्निल घुले, पराग डेरे

भटक्या विमुक्त जाती, जमाती विशेष मागासप्रवर्ग ः सुनील फळे, गणेश विधे, दिलीप अडगटला.

महिला प्रतिनिधी : स्वाती प्रमोद कांबळे, रेश्मा राजेश चव्हाण-आठरे, नयना मंदार अडगटला.

अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी ः प्रदीपकुमार जाधव, सारंग क्षेत्रे, मच्छिंद्रनाथ क्षेत्रे, अरूण राठोड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news