वाळकी : ठाकरे गटाकडून आयोगाचा निषेध; दडपशाही, हुकूमशाहीच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक

वाळकी : ठाकरे गटाकडून आयोगाचा निषेध; दडपशाही, हुकूमशाहीच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या केंद्रातील सरकारने सर्वच सरकारी यंत्रणांना गुलाम बनविले आहे. शिवसेना अणि ठाकरे सर्वमान्य गणित असताना आणि पुरावे देऊनही भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह दुसर्‍या गटाला दिली. या दडपशाही, हुकूमशाहीच्या विरोधात शिवसैनिक आक्रमकपणे लढा देईल, अशा संतप्त भावना नगर तालुका शिवसेना ठाकरे गटाने करत निवडणूक आयोगाचा निषेध केला.

नगरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर निदर्शने करत ठाकरे गटाने जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या सूचनेनुसार हा निषेध नोंदवला. यावेळी उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, उपतालुका प्रमुख जिवाजी लगड, युवसेनेचे तालुका प्रमुख प्रवीण गोरे, सुशील कदम, ज्ञानेश्वर बर्वे, रामेश्वर सोलट, माजी सभापती प्रवीण कोकाटे, संदीप गुंड, पोपट निमसे, बी. डी. कोतकर, ज्ञानेश्वर शिकारे, नवनाथ काळे, तुकाराम कासार, प्रकाश कुलट, निसारभाई शेख, विलास शेडाळे, जालिंदर शिंदे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news