नगर :  आक्षेपार्ह स्टेटसमुळे शहरात तणाव ; 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नगर : आक्षेपार्ह स्टेटसमुळे शहरात तणाव ; 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नगर : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून शहरातील बारातोटी कारंजा व आशा टाकीज चौकात बुधवारी रात्री दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वेळीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने तणाव निवळला. याबाबत दोन्ही बाजूच्या 13 जणांसह सुमारे 50 जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सद्दाम जाकीर सय्यद, साहील गुलाम दस्तगीर, मोहसीन रफिक शेख, जमील नवाज बेग, सय्यद आवेज उर्फ बोबो, सय्यद परवेज जाकीर (सर्व रा. तख्ती दरवाजा), ओंकार रमेश घोलप, रोहित सोनेकर, शुभम कोमाकूल, गोट्य परदेशी, यश घोरपडे, ऋषी लगड (सर्व रा. नगर) व अन्य 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत एका तरुणासह दोन पोलिसांनी कर्मचार्‍यांनी फिर्यादी दाखल केल्या.

ओंकार रमेश घोलप याने फिर्यादीत म्हटले, दि. 7 रोजी दुपारी घरी असताना सद्दाम जाकीर सय्यद(रा. मुकुंदनगर) याने फोन करून मोबाईलवर काय स्टेटस ठेवला आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वर्तन केले. त्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हॉटसअ‍ॅपवर प्रसारीत केली. सहायक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी फिर्यादीत म्हटले, बुधवारी रात्री पोलिस पथकासह पेट्रोलिंग करीत असताना आक्षेपार्ह स्टेट ठेवल्याने ओंकार घोलप यांला सद्दाम सय्यद याने फोन केला. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल केली.

त्यामुळे बारातोटी कारंजा येथे काही तरुण घोषणाबाजी व भाषणबाजी करीत असल्याचे आढळून आले. ओंकार घोलप याच्यासह अन्य तरुणावर गुन्हा दाखल झाला. तिसरी फिर्यादीत पोलिस कॉन्स्टेबल अभय कदम यांनी म्हटले, बुधवारी रात्री पोलिस पथकासह गस्तीवर असताना आक्षेपार्ह स्टेटच्या पार्श्वभूमीवर बारातोटी कारंजा येथे काही तरुण जमले असता दुसरीकडे तख्ती दरवाजा येथे तरुण लाकडी दांडके घेऊन फिरता ना आढळून आले. त्यावरून साहील गुलाम दस्तगीर याच्यासह अन्य तरुणावर गुन्हा दाखल झाला.

logo
Pudhari News
pudhari.news