राज्यभरातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या ; दहा उपजिल्हाधिकारी जिल्ह्याबाहेर

राज्यभरातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या ; दहा उपजिल्हाधिकारी जिल्ह्याबाहेर
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील नगर, श्रीरामपूर, शिर्डी आणि पारनेर-श्रीगोंदा या चार उपविभागीय अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. नगर प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या जागी गंगाखेडहून सुधीर पाटील, श्रीरामपूरचे अनिल पवार यांच्या जागेवर किरण सावंत पाटील येत आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांची जळगावला बदली झाली असून, त्यांच्या जागेवर हेमलता बडे, जिल्हा पुनर्वस अधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या जागेवर शाहूराज मोरे, कर्जत-जामखेड प्रांताधिकारीपदी नितीन पाटील यांची बदली झाली आहे.
जिल्ह्यात तीन वर्षे पूर्ण झालेले प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी हे बदलीच्या प्रतीक्षेत होते. राज्य शासनाने राज्यभरातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील दहा अधिकार्‍यांचा समावेश आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांची नगरचे प्रांताधिकारीपदी बदली झाली आहे. जळगाव येथील भूसंपादन अधिकारी किरण सावंत पाटील यांची श्रीरामपूरचे प्रातांधिकारीपदी बदली करण्यात आली. सावंत पाटील यांच्या रिक्त जागेवर जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांची बदली झाली आहे. जयश्री माळी यांच्या जागेवर नागपूर येथील पेंच प्रकल्पाचे भूसंपादन अधिकारी हेमलता बडे यांची बदली झाली आहे.

नगरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांची भुसावळ येथे प्रांताधिकारीपदी बदली झाली. पाटील यांच्या रिक्त जागेवर जळगावचे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील हे बदलून येत आहेत. उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांची श्रीवर्धन येथे प्रांताधिकारीपदी बदली झाली.

त्यांच्या रिक्त जागेवर नाशिकचे जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर हे बदलून येत आहेत. शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांची बदली झाली. त्यांच्या जागेवर वैजापूरचे प्रांताधिकारी माणिक आहेर यांची बदली झाली. पारनेर-श्रीगोंदाचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या जागेवर मेहकरचे प्रांताधिकारी गणेश राठोड यांची बदली झाली.

यांना नियुक्तीची प्रतीक्षा
जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, सुधाकर भोसले, गोविंद शिंदे या उपजिल्हाधिकार्‍यांना अद्यापि कोठेही नियुक्ती दिलेली नाही. त्यामुळे हे अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात यापूर्वी केले काम
नगरचे नवे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी नगर, नेवासा तहसीलदारपदी काम केलेले आहे. नवे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी यापूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी व रोहयो उपजिल्हाधिकारीपदी काम केले. हेमलता बडे यांनी नेवासा तहसीलदार, महसूल तहसीलदार, शाहूराज मोरे यांनी भूसंपादन अधिकारीपदी, माणिक आहेर यांनी राहाताचे तहसीलदार, किरण सावंत यांनी कर्जतचे तहसीलदार, अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे.

कर्जतचे प्रांताधिकारी पाटील
कर्जत-जामखेडचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबाले हे निलंबित झाले आहेत. त्यांच्या रिक्त जागेवर नितीन पाटील येत आहेत. विशेष भूसंपादन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांची माण-खटाव येथे प्रांताधिकारीपदी बदली झाली. विशेष भूसंपादन अधिकारी संदीप चव्हाण यांच्या जागेवर गौरी सावंत बदलून आल्या आहेत. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून संदीप चव्हाण काम पाहात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news