नेवासा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदांच्या निवडींमध्ये 10 निवडी बिनविरोध, तर हंडीनिमगाव येथे निवडणूक झाली. 10 गावांत आमदार शंकरराव गडाख यांचे समर्थक उपसरपंच झाले. कांगोणी गावात माजी आमदार मुरकुटे समर्थक उपसरपंच झाला. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व नायब तहसीलदार किशोर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी (दि.29) झालेल्या 11 ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदांच्या निवडीत 10 उपसरपंच बिनविरोध झाले, तर हंडीनिमगाव येथे झालेल्या निवडणुकीत अशोक कांबळे 1 मताने विजयी झाले. त्यांना सहा मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाच मते मिळाली.
दहा गावांत आमदार गडाख गटाचे उपसरपंच झाले आहेत. कांगोणी गावात माजी आमदार मुरकुटे गटाच्या सविता अप्पासाहेब शिंदे उपसरपंच झाल्या.
इतर उपसरपंच असे : माका – अनिल घुले, हिंगोणी – संतोष झिने, शिरेगाव – राधाबाई जाधव, खुपटी – मंगल किशोर कुर्हे, चिंचबन – शारदा चव्हाण, वडाळा – सचिन विलास मोटे, गोधेगाव – भीमाबाई कडूबाळ मोटे, सुरेशनगर – भागचंद पाडळे, माळीचिंचोरे – दिलीप धानापुणे. उपसरपंच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.