अहमदनगर : डिजिटल बोर्डवर आठ कोटींचा खर्च!

अहमदनगर : डिजिटल बोर्डवर आठ कोटींचा खर्च!
Published on
Updated on

गोरक्ष शेजूळ

अहमदनगर : जिल्ह्यात 30 ठिकाणी डिजीटल डिस्प्ले बोर्ड बसवले आहेत. त्यासाठी तब्बल आठ कोटींचा खर्च आला असून, हा पैसा जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 शाश्वत विकास ध्येये योजनेअंतर्गत करण्यात आल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, एकीकडे निधी नसल्याने विकासाभिमुख कामे मागे पडली असताना, या केलेल्या खर्चावर विरोधक बोट ठेवणार असल्याचेही सूत्रांकडून समजते.

जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा नियोजन विभागामार्फत डिजीटल डिस्प्ले बोर्डच्या खरेदीसाठी जीएम पोर्टलवर ई निविदा मागविली होती. यामध्ये स्टार इंटरप्रायजेस, औरंगाबाद यांची निविदा पात्र ठरवत त्यांना 30 डिजीटल बोर्ड पुरवठ्याचे काम देण्यात आले. तसे जिल्हाधिकारी यांनी संबंधित ठेकेदार कंपनीस मार्च 2023 मध्ये पुरवठा आदेश दिले होते.

यात 30 आऊटडोअर डिजीटल बोर्ड यासह सर्व्हर, इलेक्ट्रीकल केबल, फॅब्रीकेशन आणि पोल स्ट्रक्चर, पॉवर केबल, लॅपटॉप, लॅन केबल, इलेक्ट्रीकल बोर्ड, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, सॉफ्टवेअर, प्रोगॅम चार्ज इत्यादीसह सुमारे 8 कोटींचा खर्च वरील खरेदीसाठी आला आहे.
जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे यांनीही या खर्चाच्या आकडेवारीला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, शासनाच्या योजनांच्या प्रचारासाठी डिजीटल बोर्डच्या खरेदीवर तब्बल आठ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात लाभ दिल्या जाणार्‍या योजना आणि त्यावर झालेला 'हा' खर्च, याविषयी आता सामान्य नागरिकांमधूनही चर्चा सुरू झाल्याचे ऐकायला मिळत आहे.

साहित्य अन् खरेदीची किंमत चर्चेत

डिजीटल डिस्प्ले बोर्डची संकल्पना दिशादर्शक असली, तरी त्याचा खर्च हा चर्चेचा विषय ठरला आहे. संबंधित बोर्ड आणि इतर 16 खरेदी केलेल्या वस्तू, संबंधित कंपनी,खरेदीची किंमत, मूळ किंमत इत्यादी आकडेवारी ही सर्वसामान्यांना अवाक करणारी आहे. त्यामुळे ही खरेदी राज्यातही चर्चेत येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news