

सोनई : पुढारी वृत्तसेवा : येथे रस्ता रुंदीकरण झाल्याने विद्युत खांब, रोहित्रांची जागा बदलली जात आहे. महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रतीक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. राहुरी-शिंगणापूर रस्त्यावरील खांब जीर्ण झाले आहेत. आता नव्याने बसवित असलेल्या खांबांची उंची जास्त असल्याने वाहतूक सुरळीत होणार आहे.
जीर्ण खांबांमुळे ग्रामस्थांच्या जीविताला धोका आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांनी खांब बदलणे सुरू केले आहे. आता वाहतुकीस अडचणी येणार नसल्याचे ठेकेदार संदीप लोंढे यांनी सांगितले. हे काम सुरू असताना अन्य परिसरातील वीज सुरळीत राहत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.