धक्कादायक | पाच-सहा जणांकडून तरुणाला मारहाण; विहिरीत टाकून केला निर्घृण खून

धक्कादायक | पाच-सहा जणांकडून तरुणाला मारहाण; विहिरीत टाकून केला निर्घृण खून

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : पाच- सहा जणांनी मिळून तरुणाला दांड्याने जबर मारहाण करुन, त्याचे हाथपाय बांधून मुळा नदीपात्रातील एका विहिरीत टाकून त्याचा निर्घृण खून केला. ही घटना तालुक्यातील शिलेगाव येथे घडली. विजय अण्णासाहेब जाधव (30, रा. आरडगाव, बिरोबानगर, ता. राहुरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, (दि. 15 मे) रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

शिलेगाव येथे मुळा नदीच्या पात्रात एका शेतकर्‍याच्या विहिरीत बुधवारी सकाळी दांडे, चप्पल व एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. या घटनेची माहिती मिळताच पो. नि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. देवेंद्र शिंदे, सूरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, विकास साळवे, रोहित पालवे, संतोष राठोड, भाऊसाहेब शिरसाठ, गणेश लिपने यांच्या पोलिस पथकाने रुग्णवाहिका चालक सचिन धसाळसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने बाजेवरुन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृतदेह विजय जाधव याचा असल्याचे निष्पन्न झाले.

विजय जाधव (दि. 14 मे) रोजी कामावर गेला होता. नंतर तो काही मित्रांबरोबर शिलेगाव येथे यात्रेस गेला होता. यात्रेत विजय जाधव याचे मित्रांबरोबर भांडण झाले. मित्रांपैकी चार – पाच जणांनी विजय जाधव याला लाथा- बुक्क्यांसह दांड्याने मारहाण केली होती, अशी माहिती विजय जाधव याचे चुलते रमेश जाधव यांनी दिली. यानंतर बुधवारी सकाळी विजय जाधव याचा हाथपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळला. विजय जाधव याच्या नातेवाईकांनी या घटनेतील एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. विजय जाधव याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, सहा भाऊ असा मोठा परिवार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news