‘त्यांचा’ फक्त कामांच्या उद्घाटनाचा फार्स : शिवाजी कर्डिले

‘त्यांचा’ फक्त कामांच्या उद्घाटनाचा फार्स : शिवाजी कर्डिले

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  विकासकामे करण्याऐवजी फक्त उद्घाटन करून जनतेची दिशाभूल करायची. काम दहा लाखांचे अन् उद्घाटने कोटीचे, असेे उद्योग सुरू असल्याची टीका जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता केली. जेऊर येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन कर्डिले यांच्या हस्ते झाले. यावेळी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, युवा नेते अक्षय कर्डिले, बाजीराव गवारे, उपसभापती रभाजी सूळ, सरपंच ज्योती तोडमल यांच्या उपस्थित होते. कर्डिले यांनी जेऊर येथील संतुकनाथ पुलावरील फ्लेक्स फलकावरून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. 15 लाखांचा फलक पाहता हे लक्षात येते की, कामे दहा लाखाची आणि उद्घाटन मात्र कोट्यवधी रूपयांचे करायचे, अशा प्रकारे जनतेची दिशाभूल करण्याचे उद्योग सध्या सुरू आहेत. पुलासाठी जिल्हा परिषदेतून पाच लाख रूपयांचा निधी मंजूर होता. तो निधी ग्रामपंचायतीने संरक्षक भिंतीसाठी वापरलेला आहे.

तरी देखील तेथे पंधरा लाख रूपये निधी दिल्याचा फलक लावला आहे. ऊर्जामंत्री असताना कामे न करणारेच आता वीज प्रश्नाबाबत बोलत आहेत. बायजामाता यात्रेतील दगडफेकीचा निषेध करत, यापुढे अशा विघ्नसंतोषी लोकांची गय केली जाणार नाही, असा इशाराही कर्डिले यांनी दिला.

जेऊर येथे चार कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण यावेळी करण्यात आले. त्यामध्ये जलजीवन अंतर्गत पिण्याचे पाईपलाईन, 30-54 योजनेंतर्गत विविध रस्ते, संतुकनाथ पूल लोकार्पण, दलित वस्ती सुधार योजनेतील कामांचे लोकार्पण, जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी बाजार समिती संचालक धर्मनाथ आव्हाड, दत्ता तापकिरे, मधुकर मगर, नारायण आव्हाड, बबन आव्हाड, गणेश आवारे, देविदास आव्हाड, बापू आव्हाड, अशोक आव्हाड, कैलास पटारे, चांगदेव ससे, डॉ. राजेंद्र ससे, लक्ष्मण ससे, शंकर बळे, श्रितेश पवार, लक्ष्मण वीरकर, सुनील पवार, बंडू पवार, सोमनाथ तोडमल, गणेश शिंदे, बाबासाहेब तोडमल, अप्पासाहेब बनकर, आदिनाथ बनकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news