शिष्यवृत्ती परीक्षा : 20 हजार विद्यार्थ्यांचा ऑनलाईन डेमो

शिष्यवृत्ती परीक्षा : 20 हजार विद्यार्थ्यांचा ऑनलाईन डेमो

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीमध्ये झेडपी शाळांतील जास्तीत जास्त विद्यार्थी यावेत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी ऑनलाईन चाचणी परीक्षेची संकल्पना राबविली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इयत्ता पाचवी मराठी माध्यमाच्या 12630, उर्दू माध्यम 900 व इयत्ता 8 वी च्या 6540 अशा सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन चाचणी परीक्षा दिली. महिन्यात शिकविलेले घटक विद्यार्थ्यांना कितपत समजले यासाठी फक्त शिकविलेल्या घटकांवर आधारित ऑनलाईन चाचणी घेवून त्यांचे मूल्यमापन करण्याची संकल्पना शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी मांडली व त्यानुसार विद्यार्थ्यांचे पालक घरी असताना पालकांच्या मोबाईलवरून विद्यार्थ्यांना टेस्ट सोडविता यावी यासाठी टेस्टचा कालावधी 30 सप्टेंबर रोजी रात्री 7:30 ते 9 व 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते 9:30 असा सोयीचा ठेवण्यात आला होता. या परीक्षेचा निकालही ऑनलाईन संकेतस्थळावर घोषित केला आहे.

अशा प्रकारे ऑनलाईन परीक्षा घेवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासास चालना देणारी नगरची जिल्हा परिषद राज्यात पहिली ठरली आहे. जिल्हा परिषद संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या सरावासाठी अगोदरच इयत्ता 5 वी व 8 वी च्या प्रत्येकी 30 ऑनलाईन टेस्ट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.परीक्षा यशस्वीतेसाठी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख विस्तार अधिकारी श्रीमती मनीषा कुलट, विस्तार अधिकारी श्रीम.जयश्री कार्ले, तंत्रस्नेही शिक्षक बाबासाहेब पवार, मिलिंद जमादार, तसेच जिल्हा आयटी समन्वयक रवि भापकर यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच प्रश्नसंच निर्मिती कामी सचिन शिंदे, सतीश भालेकर, विजय गुंजाळ, अफसाना तांबोळी,मीना निकम,,अंजुम तांबोळी, शेख जमीर अहमद याकूब, डी.डी चव्हाण निलेश थोरात, भागिनाथ बडे, नामदेव धायतडक, रामकिसन वाघ या शिक्षकांचे सहकार्य लाभले.

महिन्यानिहाय ऑनलाईन डेमोनंतर डिसेंबर महिन्यापासून सर्व अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट घेण्यात येणार आहे. यातून निश्चित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या सरावाचा फायदा होणार आहे. यासाठी शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सरावाचा फायदा करून द्यावा.
                                          -भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news