अहमदनगर : संभाजी महाराजांचे स्मारक राज्याला प्रेरणादायी : आ. जगताप यांचा विश्वास

अहमदनगर : संभाजी महाराजांचे स्मारक राज्याला प्रेरणादायी : आ. जगताप यांचा विश्वास
Published on
Updated on
अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : महापुरुषांच्या इतिहासाच्या माध्यमातून आपल्याला काम करण्याची ऊर्जा व प्रेरणा मिळत असते. नगर शहरामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा राहत आहे. स्मारकाच्या माध्यमातून राज्याला प्रेरणादायी ठरेल. लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे कामही  सुरू होणार आहे. याचबरोबर माळीवाडा येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राज्याला प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
प्रोफेसर कॉलनी चौकात मनपातर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाला आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ. पंकज जावळे, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, मनपा महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पाताई बोरूडे, उपसभापती मीनाताई चोपडा, मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, माजी मनपा विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक श्याम नळकांडे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, ज्येष्ठनेते अशोक गायकवाड, माजी नगरसेवक तायगा शिंदे, सुरेश बनसोडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, पुतळा कृती समितीचे अजिंक्य बोरकर, शहर अभियंता मनोज पारखे, जल अभियंता परिमल निकम, इंजिनिअर रोहिदास सातपुते, इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, उद्यान प्रमुख शशिकांत नजान, सुमित कुलकर्णी, संजय सपकाळ, इंजिनियर केतन क्षीरसागर आदी उपस्थित होते.
महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे. त्यांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली त्या संकटावर त्यांनी समर्थपणे मात केली व उंच झेप ही घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्तानला तोंडात बोट घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महाराज यांनी केला.
संभाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्व होते. प्रोफेसर कॉलनी चौक येथे 18 फुटी चबुतरा व बारा फुटी पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या ठिकाणी संभाजी महाराज यांचा पुतळा उभारावा ही शिवशंभु प्रेमी यांच्या अनेक दिवसाची मागणी होती. उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, शंभुराजांचे जीवन संघर्षमय होते. प्रोफेसर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या कामाला 2011 रोजी कार्यारंभ आदेश मिळाला होता.
या कामाचे भूमिपूजन होत आहे. यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे मोठे सहकार्य लाभत आहे. काही लोक या कामात राजकारण करीत आहेत. महापालिकेच्या अधिकार्‍यांवर दबाव आणला जात आहे. या कामात किती विघ्न आले तरी आम्ही हे काम पूर्णतः कडे घेऊन जाणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

पक्षीय राजकारण बाजूला सारून विकासाला गती

कृती समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी उपोषण केले होते. त्यानंतर तातडीने मनपा प्रशासनाने हे काम सुरू केले आहे. शहर विकासाच्या कामांमध्ये पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकास कामांना गती दिली आहे. मात्र, काम शून्य असणारे लोक मताच्या राजकारणासाठी खोडा घालण्याचे काम करीत आहे, अशी खंत आमदार जगताप व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news