समता स्कूल काळानुरूप अध्यापन करते : अनिल कर्डिले

समता स्कूल काळानुरूप अध्यापन करते : अनिल कर्डिले
Published on
Updated on

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : संशोधनातून प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे. जगाच्या पाठीवर दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधक लावतात. त्याआधारे समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनीदेखील अभ्यास करुन सर्वसामान्यांना, शेतकर्‍यांना फायदेशीर ठरतील असे नव-नवे तंत्रज्ञान, उपकरणे तयार करून संशोधन क्षेत्रात नावलौकिक मिळवावा. समता स्कूल विद्यार्थ्यांच्या सुजन शक्तीचा विकास ही काळाची गरज ओळखत मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी अध्ययन प्रक्रियेच्या माध्यमातून उपयोग करून घ्यावा, असे प्रतिपादन अनिल कर्डिले यांनी केले.

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन समता स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी एके सायन्स फाउंडेशन अकॅडमीचे अध्यक्ष अनिल कर्डिले प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षीय मनोगतात स्वाती कोयटे म्हणाल्या, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शाळा नेहमी नव-नवीन उपक्रम राबवते. विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोगातून अनुभवाच्या संधी उपलब्ध करून देते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने विविध ध्येय समोर ठेवून समता स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित करून वेगवेगळी प्रात्यक्षिके करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली, असे कोयटे म्हणाल्या.
विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून बनविलेल्या वस्तूंबद्दल समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक काका कोयटे, कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे, प्राचार्या हर्षलता शर्मा व पालकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सृजना भिंगारदिवे, परिचय आकाश मिश्रा तर आभार सरिन सय्यद यांनी मानले.

उपकरणे, साधने बनवून जिंकली मने!

विज्ञान प्रदर्शनात समता स्कूलच्या इ. 1 ली ते 8 वीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत गणित, विज्ञान, संगणकीय शास्त्र अंतर्गत वेगवेगळी उपकरणे व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनविली. 'जर्नी एक्सप्लोरेशन विथ सिड टू स्पलिग' यात वेगवेगळे झोन तयार करून विद्यार्थ्यांनी सृजनशक्ती व कल्पनाशक्तीच्या आधारे नव-नवी समाजोपयोगी उपकरणे, साधने बनवून प्रमुख पाहुण्यांसह उपस्थितांची मने जिंकली. गणित, विज्ञान, संगणकीय शास्त्र विषयांच्या शिक्षकांचे मुलांना मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news