नगर: सडे रस्त्याच्या कामास गतीने सुरुवात, आ. काळे यांनी दिला होता 20 लाखांचा निधी

नगर: सडे रस्त्याच्या कामास गतीने सुरुवात, आ. काळे यांनी दिला होता 20 लाखांचा निधी

कोळपेवाडी (नगर), पुढारी वृत्तसेवा: कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सडे येथील रस्त्याला निधी देवून या रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. आ. आशुतोष काळे यांनी 20 लक्ष रुपये निधी देवून हा प्रश्न सोडविल्यामुळे जवळपास दोनशे नागरिकांची रस्त्याची समस्या मार्गी लागली आहे. तोंडावर आलेल्या पावसाळ्यात हाल अपेष्टा सहन कराव्या लागणार नाही. त्यामुळे सडे येथील नागरिक सुखावले असून त्यांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सडे येथे 20 लक्ष रुपये निधीतून सुर्यभान बारहाते घर ते मोहन देठे वस्ती रस्ता व दिगंबर लोहकणे शेड ते भास्कर बारहाते वस्ती या रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन व 7 लक्ष रुपये निधीतून देण्यात आलेल्या ओपन जिम साहित्याचे लोकार्पण नुकतेच आ.काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. काळे यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करून सूचना केल्या.

मतदारसंघातील सडे येथील रस्त्यांचा प्रश्न मागील काही वर्षापासून प्रलंबित असल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पावसाळ्यात मोठ्या यातना सहन कराव्या लागत होत्या. त्यामुळे सडेच्या नागरिकांनी आ. काळे यांना रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी द्या, असे साकडे घातले होते. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून त्यांनी या रस्त्याच्या खडीकरण कामासाठी 20 लक्ष रुपये निधी देवून या कामाचे भूमिपूजन झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकरराव रोहोम, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, सरपंच आशाबाई बारहाते, गणेश बारहाते, उपसरपंच अनिल बारहाते, रावसाहेब बारहाते, संतोष बारहाते, नितीन बारहाते, सुदाम बारहाते, रमेश वाकचौरे, विजय बारहाते, माणिक बारहाते, बाळासाहेब गुंजाळ, सागर गोरे, गोकुळ बारहाते, गणेश बारहाते, संदीप बारहाते, पांडुरंग बारहाते, दीपक बारहाते, गणेश बारहाते, अविनाश कुसाळकर उपस्थित होते.

ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी

अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचा प्रश्न सोडविताना आ.काळे यांनी वाड्या वस्त्यांच्या रस्त्यांसाठी आजपर्यंत 90 लाखांचा निधी देऊन अनेक रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्याचबरोबर सडे पाणीपुरवठा योजनेसाठी 31 लाख रुपये व अत्यंत महत्त्वाच्या असणार्‍या सडे-शिंगवे रस्त्याला 3 कोटी निधी देऊन सडे-शिंगवेच्या ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न कायमचा सोडविला आहे.

logo
Pudhari News
pudhari.news