काष्टी : किल्ले धर्मवीर गडावर बलिदान स्फूर्तीदिन

काष्टी : किल्ले धर्मवीर गडावर बलिदान स्फूर्तीदिन

काष्टी; पुढारी वृत्तसेवा : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने किल्ले धर्मवीर गड पेडगाव येथे बलिदान स्फूर्ती दिनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात स्वच्छता मोहीम, दांडपट्टा मर्दानी खेळ, नामवंत व्याख्यात्यांची व्याख्याने झाली, तसेच विविध सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ती व संघटना यांना विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

डॉ. नीलेश खेडकर यांनी आतापर्यंत केलेल्या गडकोट संवर्धन, वृक्षारोपण, गडावरील पुरातन वास्तू जतन, गड जगाच्या नकाशावर येण्यासाठी तत्कालीन तहसीलदार महेंद्र माळी यांच्याकडे केलेल्या वेळोवेळी पाठपुराव्यामुळे भूमिआभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून त्याची रीतसर मोजणी करून शासन दरबारीं नोंद लावायचे काम केले तसेच गड विकासासाठी शासकीय अधिकारी वर्गाला वेळोवेळी पाठपुरावा केला.

लवकरच गडावर दिवाबत्तीची सोय उपलब्ध करून गड प्रकाशमय करण्याचे काम देखील आपणा सर्वांच्या सहकार्याने व मदतीने पूर्ण होणार आहे तसेच ईतर सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती पुणे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील, परिक्रमाच्या अध्यक्ष प्रतिभाताई पाचपुते व डॉ. प्रणोतीताई जगताप, समिती अध्यक्ष शंकर जाधव यांच्या हस्ते डॉ.निलेश खेडकर यांना शिवकार्य विशेष सन्मान देऊन सन्मानीत केले.

यावेळी सरपंच साजन पाचपुते, वैभवदादा पाचपुते, दुबईचे सागर जाधव, सुवर्णा पाचपुते, हरिदास शिर्के, प्रवीण शेलार,भारती इंगवले, रवि शिरसाठ,आकाश शिंदे,प्रविण झांबरे, सुनील खेडकर, भगवान कणसे, गणेश झिटे, बाळासाहेब नवले, नितीन घोडकेसर, इरफान पिरजादे, अशोक गोधडे, जालिंदर खेडकर, सुनील कदम, विशाल खेडकर, शेखर खेडकर, पुरातत्त्व विभागाचे मच्छिद्र पंडित, भाऊ घोडके, नंदू क्षीरसागर, ग्रामस्थ आदींसह शिवशंभूभक्त उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news