Ahilyanagar Crime: शेतीच्या वादातून निवृत्त शिक्षकाचा खून

डोक्यात घातले कुऱ्हाडीचे घाव
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

श्रीगोंदा : शेतीच्या बांधावर मुरूम टाकल्याच्या रागातून डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालत सेवानिवृत्त शिक्षकाचा खून करण्यात आला. पिसोरे खांड येथे शुक्रवारी ही घटना घडली. पोपटराव रावजी गावडे ( वय ७८) असे मृत सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. विजय पोपट गावडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विलास दादा गावडे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

गावडे कुटुंबीय पिसोरे खांड येथे वास्तव्यास आहे. घरासमोरच त्यांची शेती आहे. मृत पोपटराव गावडे यांनी शेतात बांध बंदिस्तीचे काम हाती घेतले होते. गावडे यांच्या शेताच्या बाजूलाच विलास गावडे यांचे आठ गुंठे क्षेत्र आहे. शेत जमिनीच्या बांधावर मुरूम टाकल्याचा राग मनात धरून विलास गावडे कुऱ्हाड हातात घेत पोपटराव गावडे यांच्याशी वाद घातला.

Crime News
Barshi Teacher Family End of Life | शेअर बाजारात पावणेदोन कोटी बुडाले; बार्शीत पत्नी, दोन्ही मुलांना विष देऊन शिक्षकाने घेतला गळफास

‘तुझे काही नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई देऊ’, असे पोपट गावडे म्हणाले. त्याचवेळी संताप अनावर झाल्याने विलास गावडेने हातातील कुऱ्हाड पोपट यांच्या डोक्यात मारली. घाव वर्मी लागल्याने पोपटराव गावडे जागीच गतप्राण झाले. त्यानंतर विलास गावडेने तेथून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी भेट देऊन पाहणी केली. शव विच्छेदनासाठी पोपटराव गावडे यांचा मृतदेह श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता. फॉरेन्सिक एक्सपर्ट, इन कॅमेरा शव विच्छेदन करण्याची सुविधा नसल्याचे सांगत सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास सांगितले. यामध्ये जवळपास चार तासांचा कालावधी लोटला गेला.

Crime News
Dharur News : अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीने जीवन संपवले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news