संगमनेर : दोन कत्तलखान्यांवर छापे; 600 किलो गोमांस जप्त, दोघांना अटक

संगमनेर : दोन कत्तलखान्यांवर छापे; 600 किलो गोमांस जप्त, दोघांना अटक

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  ईद-ए-मिलाद व कोजागिरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहर पोलिसांनी शहरात दोन अवैध कत्तल खान्यांवर छापा टाकून सुमारे 600 किलो गोमांसासह इनोव्हा कार जप्त केली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. याबाबत शहर पोलिसांनी सांगितले की, शहरात मौलाना आझाद मंगल कार्यालयामागे बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा टाकून साहिल मुस्ताक कुरेशी (रा. सहारा कॉलनी) यास ताब्यात घेतले. मदिनानगर येथे शेडमध्ये कत्तल केलेले गोमांस असे 600 किलो गोमांस व इनोव्हा कार पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी पो. कॉ. अविनाश बर्डे व सचिन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आयाज हबीब कुरेशी, साद मुस्ताक कुरेशी, साहिल मुस्ताक कुरेशी पोलिसांनी आयाज कुरेशी व दुसर्‍या घटनेतील साहिल कुरेशी यास अटक केली तर साद कुरेशी पसार झाला.

संगमनेरकरांच्या तक्रारींची घेतली दखल..!
संगमनेर शहरासह तालुक्यात नागरिकांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे प्रशासना संदर्भात अनेक तक्रारी केल्या होत्या, त्यांची दखल घेण्याचे निर्देश ना. विखे यांनी अतिरिक्त पोलिस अधिक्षक स्वाती भोर, , पोलिस उपाधीक्षक राहुल मदने, पोलिस निरीक्षक सुनील पाटील, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह महसूल व पोलिस प्रशासनाच्या बैठकीत दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news