नगर : आखतवाडेत अवैध वाळू उपशावर छापा

नगर : आखतवाडेत अवैध वाळू उपशावर छापा

ढोरजळगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील ढोरा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणार्‍या तस्करांना नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून मुद्देमालासह ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.4 रोजी पोलिस हवालदार दत्तात्रय गव्हाणे, कॉन्स्टेबल सागर ससाणे, जालिंदर माने हे शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते.

त्यांना आखतवाडे येथील ढोरा नदीपात्रात एका टेम्पोमधून मजुरांच्या साह्याने अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली. पथकाने लगेच शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक रामेश्वर घुगे यांना वरील माहिती दिली. घुगे यांनी दोन साक्षीदारांना सोबत घेत गुन्हे अन्वेषणच्या पथकासह आखतवाडे येथे छापा टाकला. एका पिवळ्या रंगाच्या टेम्पोमध्ये नदी पात्रामधून वाळू भरली जात होती. पथकाला पाहताच काहीजण अंधाराचा फायदा घेत शेजारील काटवनात पसार झाले. पोलिसांनी पाठलाग केला. परंतु कुणीही मिळून आले नाही. टेम्पोमध्ये बसलेला चालक संदीप रमेश वाघमारे (वय 25, रा.देवटाकळी, ता.शेवगाव), तसेच पप्पू कचरू तुजारे (रा.हिंगणगाव, ता. शेवगाव) यांना ताब्यात घेऊन 3 लाख रुपये किंमतीचा टेम्पो आणि 20 हजार रूपये किमतीची 2 ब्रास वाळू, असा एकूण 3 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपींविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news