

Shivajirao Kardile passes away
राहुरी : राहुरी मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते वय ६७ वर्ष होते. नगर शहरातील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय प्रवास अत्यंत मोठा आणि चढ-उतारांचा राहिला आहे. नगर शहराजवळ असणाऱ्या बुरानगर गावचे सरपंच म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सरपंच ते आमदार आणि मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा विविध पक्षांमध्ये काम केले.
• २००९ मध्ये ते अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते.
• त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यात त्यांचा पराभव झाला होता.
• २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा आमदारकी लढवत विजय प्राप्त केला होता.
• २०१९ च्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
• २०१४ च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा देखील घेतली होती.
• शिवाजीराव कर्डिले यांचा मूळ व्यवसाय दूध व्यवसाय होता.
• ते नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते