खा स्व. विखे यांच्याबद्दल बोलून अकार्यक्षमता लपविण्याचा काहींचा प्रयत्न : ना विखे

खा स्व. विखे यांच्याबद्दल बोलून अकार्यक्षमता लपविण्याचा काहींचा प्रयत्न : ना विखे

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर साखर कारखान्याचे संस्थापक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील होते. मात्र, यांनी आता दुसरेच संस्थापक तयार करून कारखान्याचे संस्थापकच बदलले आहे असा गंभीर आरोप करीत खासदारांचे नाव घेऊन आपली अकार्यक्षमता लपविण्याचा ते प्रयत्न करत असल्याची जळजळीत टीका राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली.

लोणीहून नाशिकच्या दिशेने जात असताना संगमनेर येथील शासकीय विश्राम गृहावर काही काळ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील थांबले होते. त्यावेळी माजी खा स्व बाळासाहेब विखे पा यांनी संगमनेर तालुक्यासाठी 35 वर्षात काय केले असा सवाल माजी महसूलमंत्री आ बाळासाहेब थोरात यांनी केला. या वक्तव्यावर पत्रकारांनी मंत्री विखे पाटील यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की आपण पक्ष संघटनेला धरुन किती काम केले? तुमचे मेव्हणे लोकसभेला उमेदवारी करीत असताना तुम्ही कोणाला मते दिली हे सर्व जनतेला माहीत आहे. आज तुम्ही माजी खासदार विखे पाटील हयात नसताना तुम्ही त्यांच्या विषयी बोलतात हे निषेधार्य आहे. आपण सुसंस्कृत संस्कृतीमध्ये वाढलो आहोत, संघर्ष आपला आहे. जुन्या नेत्यांना यात ओढून आपण काय साध्य करणारआहात यावरून तुम्ही तुमचे पाप झाकण्याचा प्रयत्न करत आहात. याचाच अर्थ ' नाचता येईना म्हणे अंगण वाकडे' अशी आपली अवस्था झाली असल्याची टीका मंत्री विखे यांनी माजी मंत्री आ थोरात यांचे नाव न घेता केली.

मनोज जरांगे यांच्या उपोषणावरुन सुरू झालेल्या आरक्षणाबाबत मंत्री विखे पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले की जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या निस्वार्थ आंदोलनाला महायुती सरकारने यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीही मराठा समाजाला कायदेशीर टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, माजी मंत्री अशोक चव्हाण ज्या काँग्रेस पक्षात आहे त्या पक्षाची भूमिका नेमकी काय आहे हे अगोदर ठरवावे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते वेगळे बोलतात त्यामुळे त्यांच्यातच एकमत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या पक्षाचा अजेंडा ठरवावा असा टोला मंत्री विखे पाटील यांनी माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना लगावला.

माजी मुख्यमंत्री शरद पवार हे तर मराठा आरक्षणाच्या बाबतीत काहीच बोलत नाही ओबीसींमधून आरक्षण द्यावे की स्वतंत्रपणे याविषयी त्यांनी भूमिका जाहीर करण्याची गरज आहे. तर शिवसे नेचे उद्धव ठाकरे देखील अद्यापपर्यंत गप्पच बसून आहेत.काँग्रेसची तीन तोंड तीन ठिकाणी आहे या सर्वांची मराठा आरक्षणाबाबत असलेली भूमिका नेमकी काय आहे हे जाहीर करत नाही असाही सवाल त्यांनी उपस्थित करत मंत्री विखे म्हणाले की राज्यातील महायुतीच्या सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याची बांधिलकी घेतली आहे आणि लवकरात लवकर मराठा समाजाला टिकणारे आर क्षण देण्याचे धोरण यापूर्वीच राज्य सरका रने जाहीर केले आहे आणि ते आरक्षण मराठा समाजाला दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे मंत्री विखे यांनी यावेळी ठणकावून सांगितले

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याभेटीला राजकीय संदर्भात देणे हे चुकीचे आहे राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्षम उपक्रम मंत्री म्हणून काम करत आहे आणि त्यांच्यामुळे महायुती सरका रला चांगले बळ मिळाले आहे ते वेगळे होण्याच्या बाबत जे कोणी काही बोलत असेल ते चुकीचे आहे त्यामुळे आता राज्यात कुठल्याही प्रकारचा भूकंप होणार नाही असाही विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीउपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे नेते शरदपवार यांच्या भेटीबाबत व्यक्त केला

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news