

संगमनेर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वर काल सोमवारी सकाळी 10.35 वाजता टाटा झेस्ट कार आणि पिकअप या दोन वाहनांत अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली, तरी दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, काल (दि.13) नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वर बोटा गावाकडे जाणार्या रस्त्यावर स्वराज फूड मॉलसमोर पिकअप (एमएच 14 जेएल 6652) वरील चालक सिध्देश भाऊसाहेब जाधव (रा. जाधववाडी बोरी ता. जुन्नर) हा पिकअप घेऊन रस्ता क्रॉस करत असताना नाशिककडून पुणेच्या दिशेने जाणारी टाटा झेस्ट कार (एमएच 12 एलजे 7190) वरील चालक प्रमोद कुमार मारुती जाधव (रा. ओतूर) हा चालवत असलेली कार पिकअप वाहनावर आदळून अपघात झाला. सदर अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
हेही वाचा: