

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला असून यावर नगरपालिकेकडून उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र या भटक्या कुत्र्यांना पकडण्याची पद्धत अघोरी स्वरूपाची असल्याची दिसून येत आहे. भटके कुत्रे पकडताना कर्मचारी हे अतिशय धारदार तारीच्या फास्याचा वापर केला जात आहे. हा फास कुत्र्यांच्या गळयात अडकवून त्यांना दूरवर फरफटत नेत असल्याचे दिसत आहे. यामुळे अनेक कुत्री जखमी झाल्याचे दिसत आहे. शहरातील भटकी कुत्री पकडण्यासाठी नगरपालिकेकडून खासगी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली.
मात्र हे खासगी कंत्राटदार हे कुत्री पकडताना अतिशय अघोरी पद्धत वापरत असून कुत्र्यांना उचलून उंचावरून गाडीत फेकले जात आहे. कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हि कमीत कमी वेदनादायी असावी. असे असताना देखील अतिशय धारदार हत्याराचाा वापर केला जातो. याचा सानर करण्याऐवजी वाघूर वापरणे अपेक्षित होते. शहरातील भटक्या कुत्र्यांची नगरपालिकेने नसबंदी करणे, त्यांना रेबीज प्रतिबंध लस टोचणे क्रमप्राप्त आहे.
मात्र यासारखे कोणतेची उपाय योजना केल्या जात नाही. यामुळे अनेक कुत्र्यांना इजा देखील झाली आहे. तसेच एका कुत्र्याच्या गळ्यात तारेचा फासा तसाच अडकला असून तो कुत्रा गावात सैरावैर होऊन पळत आहे. याबाबत राहुरी नगरपरिषदेने ठेकेदारावर कारवाई करावी. तसेच कुत्रे पकडताना चुकीची पद्धत वापरणार्या कर्मचार्यांवर कारवाई का होऊ नये. असा सवाल प्राणी मित्रांमधून उपस्थित केला जात आहे.
हे ही वाचा :