कर्जत-जामखेडमध्ये वीजवितरणचे जाळे मजबूत!

कर्जत-जामखेडमध्ये वीजवितरणचे जाळे मजबूत!
Published on
Updated on

कर्जत/जामखेड : पुढारी वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघात वीजवितरण यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या आ. रोहित पवार यांच्या आणखी एका प्रयत्नाला यश आले आहे. मतदारसंघात तीन नवीन उपकेंद्रांना मंजुरी मिळाली असून, पाच उपकेंद्रांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. शिवाय कर्जत विभागात 334 किलोमीटरची केबल लाईन आणि 65 किमीची लिंक लाइनही मंजूर झाली आहे.
आ. रोहित पवार यांनी वीज आणि रस्त्यांसह इतरही पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला.

आता पुन्हा नव्याने महावितरणच्या आरडीएसएस योजनेंतर्गत मतदारसंघात चौंडी, चिलवडी आणि जळगाव या तीन नवीन उपकेंद्रांना मंजुरी आणली असून, कुळधरण, मिरजगाव, भांबोरे, खांडवी आणि भानगाव या उपकेंद्रांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय गळती व वीजहानी रोखण्यासाठी कर्जत विभागात 334 किलोमीटरची एबी केबल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये खर्डा, आनंदवाडी, राजुरी, सारोळा, जामखेड, तरडगाव, कर्जत, चापडगाव, मिरजगाव, बेलगाव, जुनी कोंभळी, जुने मलठण, नवी कोंभळी, नवीन मलठण, कुळधरण, शिंदा, पिंपळवाडी, कोपर्डी, नांदगाव, येसवडी, खांडवी, दूरगाव, भोसे, धालवडी, थेरगाव, चांदा, मुळेवाडी, थेरवडी, हनुमाननगर, जामदरवाडा, राक्षसवाडी, नाथाचीवाडी, टाकळी खुर्द, चांदगाव, राजुरी, पाडळी, अरणगाव, निमगाव गांगर्डा, मांदळी, बेलवंडी या गावांचा समावेश आहे.

तसेच कर्जत विभागात 65 किमीची लिंक लाइनही मंजूर झाली असून, त्याचा फायदा कोंभळी, चांदे, जामखेड, अरणगाव, खांडवी, कर्जत, नांदगाव आणि राशीन-येसवडी या गावांना होणार आहे. या सर्व कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ही कामे सुरू करण्यात आल्याची माहिती आ. पवार यांनी दिली. कृषी आकस्मितता निधीतून (एसीएफ) घुमरी उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून, दिघोळ उपकेंद्राचेही काम लवकरच सुरू होणार आहे आणि राशीन उपकेंद्राच्या विस्तारीकरणाचेही काम पूर्ण झाले आहे. यामुळे शेतकर्‍यांना अखंडित आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे.

वीजपुरवठ्यात मोठी सुधारणा : आ. रोहित पवार

कर्जत-जामखेड मतदारसंघात वीजपुरवठ्याबाबत शेतकर्‍यांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मतदारसंघातील हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टीने पहिल्यापासून प्रयत्न करून राज्य सरकारकडून त्यासाठी पुरेसा निधी मंजूर करून आणला. त्यामुळे मतदारसंघातील वीजपुरवठ्यात मोठी सुधारणा झाली, याचे लोकप्रतिनिधी म्हणून समाधान आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news