श्रीगोंदा : वारूगडावर प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम; 51 व्या मोहिमेचा गाठला टप्पा

श्रीगोंदा : वारूगडावर प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम; 51 व्या मोहिमेचा गाठला टप्पा

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या वतीने सातारा जिल्ह्यातील वारूगड येथे 51 वी प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शिवदुर्गकडून महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या गडकोटांची माहितीपूर्ण अभ्यास मोहीम, गडकिल्ले संवर्धन, बारव जतन व ऐतिहासिक वारसा, संस्कृती जतन आणि सातत्याने गडावरील प्लॅस्टिक स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या मार्गर्शनाखाली रविवार दि.9 एप्रिल रोजी छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या वारूगडावर प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत 34 सदस्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी 7 गोण्या भरून प्लॅस्टिक गोळा केले. वारूगडावरील बालेकिल्ला, पाण्याची टाकी, महादरवाजा व चढाई मार्गावरील पर्यटकांनी झुडपांमध्ये टाकलेला प्लॅस्टिक कचरा गोण्यामध्ये गोळा करून गडाखाली आणण्यात आला. भैरवनाथ मंदिर परिसरातील कचरा कुंडीत हा सर्व कचरा टाकण्यात आला.

यामध्ये शिवदुर्ग परिवारातील अजित दळवी, मारूती वागस्कर, अमोल बडे, कांतीलाल फडतरे, अशोक गदादे, नीरज पाडळे, रमेश चांदगुडे, तारा चांदगुडे, संगीता इंगळे, विजया लंके, सुचित्रा दळवी, कविता खराडे, पूजा जाधव, सुनिता लोंदे, वैशाली गायकवाड, शितल गदादे, सागर शिंदे, मिठू लंके, बंडू कोथिंबीरे या शिलेदार मावळ्यांसह महिला रणरागिणी, बालमावळ्यांनी उत्स्फर्तपणे सहभाग नोंदविला.

सुवर्णमहोत्सवी प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम
शिवदुर्गने प्लॅस्टिकमुक्त गडकिल्ले उपक्रम पाच वर्षांपासून सुरू केला आहे. प्रत्येक महिन्याला एका गडावर ही मोहीम राबवित आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांवर ही मोहीम राबवून आम्हाला चांगले शिवकार्य केल्याचा सार्थ अभिमान वाटतो, अशी माहिती वैशाली गायकवाड यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news