आढळा लाभक्षेत्रात ‘निळवंडे’ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनास विरोध

आढळा लाभक्षेत्रात ‘निळवंडे’ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनास विरोध
Published on
Updated on

देवठाण : पुढारी वृत्तसेवा :  अकोले तालुक्यातील निळवंडे येथील धरणासाठी जमीन संपादन झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे पुनर्वसन आढळा धरणाच्या लाभक्षेत्रात करण्यास देवठाण ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. याप्रश्नी लवकरच जनआंदोलन सुरू करणार असल्याची माहिती देवठाण गावचे माजी सरपंच एकनाथ सहाने व इतरांनी दिली आहे. मेंगाळ व ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व विभागीय आयुक्त नाशिक यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले की, 1975 मध्ये देवठाण गावात आढळा धरण बांधण्यात आले.

या धरणासाठी देवठाण गावातील शेकडो एकर जमीन या मध्यम प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. ज्या शेतकर्‍यांची जमीन संपादित झाली त्या शेतकर्‍यांना लाभक्षेत्रातील 15 गावांपैकी फक्त दोन ते तीन गावांमध्ये पाच- सहा एकर क्षेत्र आढळाच्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन म्हणून देण्यात आले. त्यातील अनेक शेतकर्‍यांनी जमिनीचा ताबाच दिला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना आजही प्रत्यक्षात पुनर्वसनात मिळालेली जमीन ताब्यात मिळाली नाही.

जवळेकडलग, राजापूर, कोणझिरा पिंपळगाव, धांदरफळ, वडगावलांडगा, चिखली, निमगाव भोजापुर, चिकणी, गणोरे, पिंपळगाव निपाणी, हिवरगाव आंब्रे, डोंगरगाव, विरगाव, नळवाडी आणि कासारवाडी या 15 गावांची शेती ओलिताखाली आली आहे, मात्र ज्यांची जमीन गेली. त्यांचे पुनर्वसन या गावांमध्ये झाले नाही. आढळा धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये पुनर्वसन क्षेत्र मिळाले नाही, म्हणून अनेक शेतकरी व त्यांचे कुटुंब उध्वस्थ झाले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार यासारख्या महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींनी व वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांनी नियोजनबद्ध प्लॅन तयार करून पुनर्वसन केले नाही. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मागील महिन्यात देवठाणसह परिसरातील शासकीय जमिनी शोधून पुनर्वसनासाठी आढळा धरणाच्या प्रकल्पग्रस्तांना देण्याऐवजी दस्तूर खुद्द देवठाण गावातच आढळा धरणाच्या परिसरात निळवंडे येथील दोन शेतकर्‍यांना चाळीस- चाळीस आर म्हणजे दोन एकर क्षेत्र पुनर्वसन म्हणून देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे पुनर्वसन म्हणून देण्यात आलेली जमीन आजमितीला शासनाच्या नावावर असली तरी त्या जमिनीवर देवठाण ग्रामपंचायतचा ताबा आहे. हे क्षेत्र देवठाण गावाच्या लगत असल्याने गावाच्या विविध उपयोगासाठी व गावठाण वाढीसाठी या क्षेत्राचा उपयोग करावयाचा म्हणून वडिलोपार्जित लोकांनी या क्षेत्रावर देवठाण ग्रामपंचायतचा ताबा ठेवण्यात आला आहे, परंतु महसूल खात्याने स्थानिक ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून अगदी गुपचूपपणे सदर जमीन क्षेत्र सर्वे नंबर 257 या जमिनी क्षेत्रातून दोन एकर जमीन निळवंडेच्या धरणग्रस्तांना देऊन आढळा धरणग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. यामुळे ग्रामस्थ प्रचंड संताप संतप्त झाले असून, ते आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. लवकरच देवठाण गावातील ग्रामस्थांचे सर्व पक्षी आंदोलन उभारून उभारण्याचे ठरविले आहे.

40 वर्षांपासून लढा सुरूच..!
आढळा धरणातील प्रकल्पग्रस्तांना जमीन मिळावी, यासाठी तहसीलदार, प्रांतअधिकारी, जिल्हाधिकारी व जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना गेल्या 40 वर्षात अनेक वेळा निवेदने दिली, अर्ज पाठवले, आंदोलने केली. परंतु लाभक्षेत्रातल्या 15 गावांमध्ये जमीन प्रकल्पग्रस्तांना मिळाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news