श्रीरामपूरातील कोणालाही विस्थापित होऊ देणार नाही : रावसाहेब दानवे

श्रीरामपूरातील कोणालाही विस्थापित होऊ देणार नाही : रावसाहेब दानवे

श्रीरामपूर ; पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर शहरासह दत्तनगर ग्रामपंचायत ते शिरसगाव ग्रामपंचायत रेल्वे परिसरामध्ये राहणार्‍या उत्तर आणि दक्षिण भागातील रहिवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे विभागाने नोटीस बजावून ते राहत असलेल्या जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न नोटीसीद्वारे होत आहे. यामुळे रेल्वेच्या दोन्ही बाजूंनी राहणार्‍या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे जावून शिष्ट मंडळाने व्यथा मांडल्या असता, श्रीरामपुरातील कोणालाही विस्थापित होऊ देणार नाही, असा शब्द रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला.

श्रीरामपूरातील नेवासा रोड, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नव्याने प्रस्तावित रेल्वे मालधक्क्यामुळे स्थानिक रहिवासी व व्यावसायिकांना विस्थापित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. माल धक्क्यावर सिमेंट भराई व उतराईमुळे माती मिश्रित सिमेंटच्या प्रदूषणामुळे अनेक रहिवासी आजारी पडले आहेत. काहींना दमा, हृदय विकार व डोळ्यांचे आजार मोठ्या प्रमाणात झाले. येथे महाविद्यालये, मोठी हॉस्पिटल, शाळा असल्याने शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विद्यालय व महाविद्यालयांमध्ये श्रीरामपूर तालुक्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यास येतात.

याप्रश्षनी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. व खा. डॉ. सुजय विखे पा. यांची विस्थापित होऊ पाहणार्‍या रहिवाशांनी भेट घेऊन त्यांना मागण्याचे निवेदन सादर केले होते. यासंदर्भामध्ये मंत्री विखे पा. यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याशी संपर्क करून रेल्वे लाईन परिसरात नागरिकांच्या मागण्या संदर्भामध्ये योग्य मार्ग काढण्यासाठी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे रेल्वेमंत्री दानवे यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित केली होती. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पठारे, विधानसभा अध्यक्ष नितीन दिनकर, कामगार नेते नागेश सावंत, आपचे नेते तिलक डुंगरवाल, शिवसेनेचे नेते सचिन बडदे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची भेट घेण्यात आली.

यावेळी कामगार नेते नागेश सावंत म्हणाले, रेल्वे लाईनच्या दोन्ही परिसरामध्ये राहणारे रहिवाशांना कोणत्याही प्रकारचे त्याचे मालमत्तेवर दुकान व गाळ्यांना धक्का पोहोचणार नाही, यासाठी मंत्री दानवे यांनी प्रयत्न करावे.
डुंगरवाल म्हणाले, या ठिकाणी नेवासा रोड कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर प्रस्तावित रेल्वे माल धक्का झाल्याने अनेक कुटुंब हे बेघर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सचिन बडदे यांनी, श्रीरामपूर व उवर्रीत महाराष्ट्रातील अतिक्रमांचा प्रश्न वेगळा असल्याचे सांगितले.यावेळी संजय गांगड ,अशोक बागुल, डॉ. भालेराव, मुक्तार शहा, विकास डेंगळे यांनी सूचना मांडल्या. डॉ. शिरसाट, किरण बोरावके, दीपक चव्हाण, मारुती बिंगले, रुपेश हरकल, सतीश सौदागर, नाना गांगड, बंडू शिंदे, मंजुश्री ढोकचौळे, पुजा चव्हाण, युवराज घोरपडे, मोहन अग्रवाल, गणेश कटके, प्रसाद कटके, अलीम शेख, मुबारक शेख, राहुल रणपिसे, सोनाबाई रजपूत, सुरेखा लोळगे, मंगल लोळगे, मनीषा मोरे, लिलाबाई थोरात, मायावती शिरसाठ, सुशीला सुपेकर, अन्नपूर्णा खंदारे, गौरी सोनवणे, शकीला पठाण, सुनिता सुपेकर ,ताराबाई अवताडे ,सिंधू नागुडे, राणी सूर्यवंशी ,आरती सूर्यवंशी ,विजय शेटे, अश्विनी लोळगे, ताराबाई लोळगे, वैष्णवी कराळे, हिराबाई भराडकर, अंबिका सुपेकर, जयश्री लोळगे, राधिका लोळगे, ज्योती सुपेकर, आदी उपस्थित होते.

मालधक्काप्रश्नी योग्य वेळी योग्य निर्णय घेणार..!

रेल्वे राज्यमंत्री रावसोहब दानवे म्हणाले, हा प्रश्न महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी सांगितला आहे. रेल्वे प्रशासनाने ज्या नोटिसा दिल्या, त्या अनुषंगाने चौकशी करून रेल्वेची हद्द निश्चिती विषयक संपूर्ण कागदपत्रांबाबत संपूर्ण पुरावे व स्थानिक रहिवाशांकडील खरेदी खत, मालमत्तेची कागदपत्रे एकत्रित करावे. यावर योग्य तो निर्णय त्यावेळी घेऊ, असा शब्द यावेळी बोलताना मंत्री दानवे यांनी शिष्ट मंडळाला दिला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news