उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही बैठक नाही; कर्जत-जामखेडकरांचा आज ‘रास्तारोको’

उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही बैठक नाही; कर्जत-जामखेडकरांचा आज ‘रास्तारोको’

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाटेगाव-खंडाळा येथील 'एमआयडीसी'साठी आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात भर पावसात आंदोलन केले होते. उद्योगमंत्री उदय सावंत यांनी बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दुसर्‍या दिवशी आमदार पवार अधिकार्‍यांसह बैठकीला गेल; परंतु उद्योगमंत्री सावंत बैठकीला आलेच नाही. यामुळे मतदारसंघात विविध ठिकाणी गुरुवारी (दि. 27) आंदोलन करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. 'एमआयडीसी'चा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आमदार रोहित पवारांनी वेळोवेळी उद्योग मंत्र्यांच्या भेटी घेऊन हा विषय मार्गी लावण्याबाबत विनंती केली.

आंदोलनाला बसलेल्या आमदार रोहित पवारांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन तत्काळ उद्याच्या उद्या बैठक लावून चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दुसर्‍या दिवशी आमदार पवारांसह अधिकारी बैठकीच्या प्रतीक्षेत तब्बल साडेचार तास मंत्र्यांची वाट पाहत होते.

परंतु, उद्योग मंत्री सामंत बैठकीला आले नाही. यावरून सरकार पुन्हा एकदा कर्जत-जामखेड मतदारसंघातील 'एमआयडीसी'च्या निर्णयाबाबत उदासीन असल्याचे दिसून आले. या घडामोडींवरून कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवा व नागरिक आक्रमक झाले असून, आमदार पवारांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील विविध ठिकाणी गुरुवारी (दि.27) रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलन होणारी ठिकाणे

करमाळा चौक राशीन : सकाळी 9 वाजता
माहीजळगाव चौक : सकाळी 8:30 वाजता
क्रांती चौक मिरजगाव : 8:30 वाजता
खर्डा चौक जामखेड : सकाळी 11 वाजता
छत्रपती चौक कर्जत : सकाळी 10 वाजता

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news