

कोरडगाव; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण, आरोग्य व पाणी या शाश्वत विकासाला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. कळस पिंपरी येथे सरपंच दिगंबर भवार मित्र मंडळ आयोजित भूमिपुत्रांच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. जलसंपदा विभाग नाशिकचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रामायणाचार्य हभप लक्ष्मण महाराज भवार व पत्रकार दादासाहेब येढे यांच्यासह गावातील विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करणार्या 48 जणांचा भूमिपुत्र म्हणून सन्मान करण्यात आला.
आमदार राजळे म्हणाल्या, या भागात जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना राबविली असली तरी, अजूनही पुरेसे पाणी आपण अडवू शकलो नाही. त्यामुळे मार्च व मे दरम्यान शेतकर्यांना शेतीसाठी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यासाठी शेततळे अस्तरीकरण करून लाभ घ्यावा. या कार्यक्रमास सुधाकर भवार, पवार गुरुजी, बुळे गुरुजी, दादासाहेब येढे, सरपंच बळीराम मिसाळ, साजन पवार, आजिनाथ भवार, राजेंद्र गणगे, बद्रीनाथ येढे, श्रीधर मिसाळ, अमीन शेख आदी उपस्थित होते.