रुग्णसेवेचा विडा; पण मनुष्यबळाचा तिढा!

रुग्णसेवेचा विडा; पण मनुष्यबळाचा तिढा!
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी कोट्यवधीची साहित्य साम्रुगी, आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, पुरेसे मनुष्यबळ नसल्याचेही तितकेच वास्तव आहे. सध्या वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, आणि वर्ग 4 या संवर्गातील तब्बल 358 पदे रिक्त असून, ही पदे भरण्यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून शासनाकडे आवश्यक ती माहिती पाठविण्यात आल्याचे समजले.
शासनाने नुकतीच नोकरी भरतीवरील बंदी उठवली आहे. त्यामुळे क संवर्गातील 80 टक्के रिक्त जागा भरण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. हे सुरू असताना आरोग्य सेवेसारख्या विभागातही केवळ संवर्ग क नव्हे तर वर्ग1, वर्ग 2 सारख्या जागाही रिक्त असल्याच दिसते.

डॉक्टरांची 59 पदे रिक्त

वर्ग 1 आणि वर्ग 2 मध्ये प्रामुख्याने डॉक्टरांची पदे भरली जातात. सिव्हील रुग्णालयात 210 पदे मंजूर आहेत. मात्र, यापैकी 151 पदे भरलेली आहे. तर 59 पदे रिक्त असल्याचे आकडेवारीतून दिसते. ही पदे मंत्रालयातून भरली जातात.

संवर्ग 3 ची भरती नाशिकहून?

संवर्ग 3 मध्ये पॅरोमेडीकलमध्येही 320 पैकी 100 जागा रिक्त आहेत. फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ इत्यादी पदे यामध्ये रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्याची जबाबदारी नाशिक विभागीय अधिकार्‍यांकडे असल्याचे समजते.

'सुश्रुषा' भरतीच्या हालचाली

संवर्ग 3 मध्ये सुश्रूषामधील परिचारीका, परिचर इत्यादी पदे भरण्यासाठीही प्रशासनाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. सुश्रूषाची 26 पदे रिक्त आहेत.

सिव्हीलमध्ये 282 बेड
जिल्हा रुग्णालयात 282 बेड आहेत. या रुग्णालयाकडे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांचाही कल आहे. दिवसेंदिवस खासगीच्या तुलनेत सिव्हीलमध्ये गोरगरीबांना चांगल्या दर्जाची रुग्णसेवा मिळत असल्याने इकडे आता बेडही कमी पडू लागल्या आहेत. तर मनुष्यबळही कमी पडू लागले आहे.

कोरोनानंतर घडी पूर्वपदावर

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी कोरोनात विस्कळीत झालेली रुग्णसेवेची घडी पुन्हा एकदा बसवली आहे. कोरोना कालावधीत रुग्णालयात प्रसुती बंद होती. आता जानेवारीपासूनच ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. 24 तास रुग्णांना सेवा कशी देता येईल, यासाठी त्यांनी प्रशासनासोबत मायक्रो प्लॅन तयार केलेला आहे.

संवर्ग मंजूर भरलेली रिक्त
वर्ग 1 50 25 25
वर्ग 2 160 126 34
वर्ग 3 320 220 100
शुश्रुषा 362 326 36
वर्ग 4 387 224 163
एकूण 1279 921 358

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news