श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : कार्यालयीन वेळेत मद्यपान केल्याप्रकरणी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक अविनाश देविदास निकम यास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. दरम्यान, आयुक्तांच्या या कारवाईने महसूल खात्यात खळबळ उडाली आहे. अविनाश निकम हे कार्यालयीन वेळेत एका व्यक्तीबरोबर मद्यपान करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी चौकशी व वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले असता निकम यांनी धूम ठोकली. याबाबतचा अहवाल श्रीगोंदा तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवला. जिल्हाधिकारी कार्यालयाने आयुक्त कार्यालयास निलंबित करण्याबाबत अहवाल पाठवला. त्यानुसार नाशिक महसूल विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी निकम यांना निलंबित केल्याचे आदेश पारित केले आहेत.
कार्यालयीन वेळेत कर्मचारी मद्यपान करत असतील, तर ही नक्कीच गंभीर बाब आहे. इतरही काही विभागात काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत मद्यपान करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचाही योग्य वेळी बुरखा फाडणार आहोत. निकम याच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने कामचुकार कर्मचार्यांना चाप बसणार आहे.
– टिळक भोस, बीआरएस नेते
हेही वाचा