नगर : पुणे, मुंबई शहर ठरले अजिंक्य ! एका गुणाने मुंबई शहरने केला नगरचा पराभव

नगर : पुणे, मुंबई शहर ठरले अजिंक्य ! एका गुणाने मुंबई शहरने केला नगरचा पराभव

नगर : पुढारी वृत्तसेवा  :  अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेतर्फे आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या मान्यतेने आयोजित 70व्य महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई शहरने बाजी मारत अजिंक्यपद पटकावले. मुंबई शहरने नगरला 32 -31, असे एका गुणाने हरवले. अतिशय अतितटीचा हा सामना झाला. आमदार नीलेश लंके, शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजयी संघाला चषक प्रदान करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर नगर जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आमदार नीलेश लंके, पदमश्री पोपटराव पवार, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, सचिव शशिकांत गाडे, आजीव अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, उपाध्यक्ष प्रकाश बोरुडे, उपाध्यक्ष जयंत वाघ, अहमदनगर महानगर पालिकेच्या महापौर रोहिणी शेंडगे, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर, युवा सेनेचे माजी नगरसेवक विक्रम राठोड, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, नगरसेवक सचिन शिंदे, संतोष गेणाप्पा, कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू संगीता सोनावणे कोकाटे, शैला रायकर पेडणेकर, आशा गायकवाड, चव्हाण, राष्ट्रीय खेळाडू संध्या म्हात्रे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, शोभा भगत शिंदे, विद्या पठारे हनवंते आदी उपस्थित होते.
नगर आणि मुंबई शहर दरम्यान झालेला अटीतटीचा अंतिम सामना 25 – 25, असा बरोबरीत होता. रेड गुणामध्ये मुंबई आणि नगरमध्ये 15 – 15, अशी बरोबरी होती. टॅकल पॉईंट्समध्ये नगर 10 गुण घेऊन पुढे होते.

मुंबई शहरने नगरला दोनदा ऑल आउट करून नगरवर लोन चढवले होते. तरीही हा सामना बरोबरीत होता. त्यानंतर पंचानी दोन्ही संघाना 5 – 5, चढायाचा सामना खेळण्यास सांगितले. चार चढायापर्यंत सामना बरोबरीत होता. परंतु, नगरचा कप्तान शंकर गदईने मुंबई शहरच्या ओंकारला यश्वस्वी पकड केली आणि सामना फिरला. त्यावेळी नगर 30 , मुंबई शहर 28, असा गुणफलक होता. तेव्हा नगरने बोनस गुण मिळवत एक गुण पटकावला. नगर 30, मुंबई 28 असा होत. नंतर पुन्हा सामना बरोबरीत आला. आणि गोल्डन रेडपर्यंत सामना गेला. त्यात टॉस जिंकून नगरने गोल्डन रेडचा अवसर निवडला. त्यात मात्र मुंबईने बाजी मारली.

वाडिया पार्क मैदानावर 27 जानेवारी ते 30 जानेवारी असा कबड्डी चा थरार नगरकर यांनी अनुभवला. स्पर्धा संपल्यानंतर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. पुरुषांत नगर विरुद्ध मुंबई शहर सलग दुसर्‍या वर्षी अंतिम फेरीत एकमेकांसोबत भिडले. 5-5, चढायांच्या डावात बाजी पलटविली. नगर येथील वाडिया पार्क मैदानावरील मॅटवर सुरू असलेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात पुण्याने नंदूरबारला 37-16, असे सहज नमवित अंतिम फेरीत धडक दिली. पहिल्या डावातच 31-07 अशी आघाडी घेत गतविजेत्या पुण्याने आपला इरादा स्पष्ट केला.

आम्रपाली गलांडे हिच्या भन्नाट चढाया रोखण्यास नंदूरबारकडे उत्तर नव्हते. तर अंकिता जगतापचा बचाव भेदने नंदुरबारच्या चढाईपट्टूना जड जात होते. नंदूरबारची समृद्धी कोळेकर एकाकी लढली. दुसर्‍या उपांत्य सामन्यात मुंबई शहरने पालघरचा प्रतिकार 56-28 असा मोडून काढत अंतिम फेरीत धडक दिली. पालघरने सलग दोन गुण घेत सुरुवात झोकात केली.पण नंतर त्यांचा जोश कमी झाला. पूर्वार्धात लोण देत 24-13 अशी आश्वासक आधाडी मुंबईने घेतली होती. उत्तरार्धात आणखी तीन लोण देत आपली आघाडी वाढवीत नेली. पालघरने उत्तरार्धात तीन अव्वल पकड करीत सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. पण मुंबईने 28 गुणांच्या फरकाने सामना जिंकला. मेघा कदम हिचा अष्टपैलू खेळ तिला पूजा यादव, पौर्णिमा जेधेची मिळालेली चढाई-पकडीची साथ यामुळे हे सहज शक्य झाले. हर्षदा शेट्टी, रेणुका नम यांनी पालघरकडून कडवी लढत दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news