

राहुरी (अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शेतात गेलेल्या अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या गावत (दि. 18) जून रोजी घडली. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अपहरणचा गुन्हा दाखल झाला.
16 वर्षे 5 महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह पश्चिमेला एका गावात राहते. दि. 18 जून रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी तीच्या घरात होती. तेव्हा ती बाथरुमला चालले, असे सांगुन ती तीच्या घरापासून शेतात गेली.
बराचवेळा झाला तरी ती घरी आली नाही. म्हणून तीच्या नातेवाईकांनी तिचा आजुबाजुला परिसरात व नातेवाईक यांचेकडे चौकशी केली. मात्र ती मिळून आली नाही. पिडीत मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी तीच्या आई वडीलांच्या रखवालीतून पळवून नेले. पिडीत मुलीला राजु गुलाब बर्डे (रा. कामतवाडी, ता. पारनेर) याने पळवून नेले. असेआई वडीलांना संशय आहे. पिडीत मुलीच्या आईने राहुरी पोलिसत फिर्याद दिली. राजू गुलाब बर्डे (रा. कामतवाडी, ता. पारनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
हेही वाचा