

दूध व्यवसायाला उभारी देण्यासाठी सरकारतर्फे एकीकडे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दुसरीकडे पशुखाद्याचे व हिरव्या चार्याचे दर वाढले आहेत. शिवाय अद्याप अनुदानही मिळाले नाही. त्यामुळे एकूण खर्च व उत्पादन यांचा मेळ बसत नसल्याने लाडका शेतकरी मात्र नाराज असल्याचे पाहायला मिळाले आहे.
गेल्या काही वर्षांत दूध व्यवसाय ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा कणा बनला आहे. अनेक शेतकरी मुख्य व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे वळाले आहेत. परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दूध व्यवसाय कोलमडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून दुधाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. याकडे मात्र प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकरी दूध व्यवसायासाठी पंजाब, हरियाणा येथून गायी, म्हैशी खरेदी करण्यात येत आहेत. परंतु दुधाला भाव नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
सध्या पशुखाद्यांच्या दरात व हिरवा चार्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत दुधाला मिळणारा कमी आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने दूधउत्पादकांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. तसेच शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दूध व्यवसाय करणार्या शेतकर्यांना अनुदान देण्याचे ठरताच दूध घेणार्या चेअरमनचे कमिशन 2 ऐवजी 1 रुपया करण्यात आले. दूध घेणार्या चेअरमनची दूध डेअरीचा व्यवसाय करण्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक या व्यवसायात आहे. सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी तर अडचणीत आले आहेत; परंतु दूध डेअरीचा चेअरमन अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकर्यांसह चेअरमनही अडचणीत आणण्याचे काम या सरकारने केले आहे.