

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]
निघोज : पुढारी वृत्तसेवा : मळगंगादेवीच्या हेमाडपंती बारवेमध्ये श्रींच्या घागरीची मानकरी व पुजारी गायखे बंधूंच्या हस्ते विधीवत पूजा करून सकाळी आठ वाजता मिरवणूक काढण्यात आली. त्यासोबत मंदिरातील पालखीही बारवेकडे मिरवणुकीने गेली. या मिरवणुकांमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांवरून या मिरवणुकीवर फुले व रेवड्यांचा वर्षाव करीत भाविकांनी मळगंगा देवीचा जयजयकार केला. तब्बल तीन तास ही मिरवणूक लक्षवेधी ठरली.
गुरुवारी (दि. 13) मुख्य यात्रा सुरू झाली. शुक्रवारी (दि. 14) घागर दर्शन मिरवणूक थाटामाटात झाली. मळगंगा मंदिरासमोरील मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट मंडपामध्ये आमदार नीलेश लंके यांनी देणगीदारांच्या पावत्या तयार करीत ट्रस्टला तसेच ग्रामस्थांना सहकार्य केले. त्यानंतर त्यांनी देवीचे दर्शन घेऊन हेमाडपंती बारव परिसरात विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. या वेळी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकरशेठ कवाद, उपाध्यक्ष शांताराम लंके, कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके, सचिव शांताराम कळसकर यांनी यात्रेकरूंना शुभेच्छा देऊन विकासकामांची माहिती दिली. माजी विश्वस्त नानापाटील लंके, निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद आदी उपस्थित होते.
[web_stories title="true" excerpt="true" author="false" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]
शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता कुंड (जगप्रसिद्ध रांजणखळगे) परिसरातील मळगंगा देवीची यात्रा सुरू झाली. निघोज येथून दुपारी तीन वाजता देवीच्या पालखीची व काठ्यांची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पाच ते साडेपाच दरम्यान कुंडावर पोहोचल्यावर तेथील यात्रेला सुरुवात झाली. शनिवारी (दि.15) हगाम्याने या यात्रेची सांगता होणार आहे.