

पारनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा : पारनेर-म्हासणे फाटा रस्त्यावर वडनेर हवेली जवळ मोटारसायकल स्वराने पायी चाललेल्या निवृत्त शिक्षकास जोराची धडक दिल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला.
वडनेर हवेली येथील निवृत्त शिक्षक हरिभाऊ बढे रविवारी (दि .23) सांयकाळी पारनेर म्हसणे फाटा रस्त्याने वडनेर हवेलीच्या शिवारात चालले आसताना पारनेरकडून म्हसणे फाटा औद्योगिक वसाहतीकडे जाणारी परप्रांतीय कामगारांने त्यांची मोटारसायकल (एमएच 16 सीएच 0784) या गाडीची बढे यास मागून जोराची धडक दिली.
धडक खूप जोराची आसल्याने बढे लांब जाऊन पडले व जबर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. मोटारसायकल चालकही लांब जाऊन पडला. यात मोटारसायकलवरील दोघांपैकी एक जखमी झाला असून, त्यास रुग्णालयात नेले होते. येथून तो पसार झाला. घटनेची माहिती मिळताच सुप्याचे पोलिस पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णवाहिका चालक सादिक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुपा पोलिसांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली असून, या घटनेतील मोटारसायकल स्वराचा शोध घेत आहेत.