पाथर्डी : वाढती गुन्हेगारी रोखाण्यासाठी सराफांचा बंद; पोलिस ठाण्यावर मूक मोर्चा

पाथर्डी तालुका ः व्यापार्‍यावरील खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापारी, नागरिकांनी शुक्रवारी पोलिस ठाण्यावर काढलेल्या मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले.
पाथर्डी तालुका ः व्यापार्‍यावरील खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापारी, नागरिकांनी शुक्रवारी पोलिस ठाण्यावर काढलेल्या मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले.

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : सराफ व्यावसायिक राजेंद्र उर्फ बंडू चिंतामणी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करणार्‍या हल्लेखोराचा शोध लावावा. तसेच तालुक्यातील वाढती गुन्हेगारी रोखावी, या मागणीसाठी पाथर्डी शहरात कडकडीत बंद पाळत पाथर्डी पोलिस ठाण्यावर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मूक मोर्चा काढला. सराफ व्यावसायिकांनी दिवसभर दुकाने बंद ठेवत चिंतामणी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.

अ‍ॅड.प्रताप ढाकणे, राहुल राजळे, अभय आव्हाड, सुभाष घोडके, अशोक गर्जे, गोकुळ दौंड, देवीदास खेडकर, माणिक खेडकर, शिवशंकर राजळे, भगवान दराडे, विष्णूपंत ढाकणे, सागर गायकवाड, डॉ मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, विष्णूपंत अकोलकर, अमोल गर्जे, काकासाहेब शिंदे, किसन आव्हाड, मुकुंद गर्जे, मुकुंद लोहिया, संतोष जिरेसाळ, अरविंद सोनटक्के, बंडू भांडकर, रामनाथ बंग, अजय भंडारी, वैभव शेवाळे, रवींद्र पथरकर, महेश बोरुडे, रणजित बेगळे, प्रसाद आव्हाड, रवींद्र वायकर, सुनील ओव्हळ, सचिन नागापुरे, प्रशांत शेळके यांच्यासह शेकडो पाथर्डीकरांनी मोर्चात सहभाग घेतला.

पाथर्डी गुन्हेगारांचे केंद्रबिंदू होऊ पाहत असताना पोलिस डोळेझाक करतात. पाथर्डी चोराचा बाजार झाला आहे. शहरात वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. महिलांची छेड काढत सोन्याच्या दागिन्यांची लूट केली जाते. तालुक्यात सुरक्षितता राहिली नसल्याने व्यापारी शहरी भागात स्थलांतरित होत आहेत. सामान्यांवर सर्रास 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जातात. पोलिसांकडून धमकी दिली जाते. पाथर्डी पोलिस ठाण्यात एजंट पोलिसांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात. पाथर्डी पोलिस ठाणे माफियांचा अड्डा बनला आहे.

लोकप्रतिनिधी एखाद्या प्रकरणात मध्यस्थीसाठी आल्यावर दमात घेऊन डांंबून ठेवण्याचे काम केले जाते. पोलिसांचा गुन्हेगारावर दबाव राहिला नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहे, अशी टीका भगवान दराडे, बंडू पाटील बोरुडे, सुभाष घोडके, डॉ मृत्युंजय गर्जे, विष्णू ढाकणे, देवीदास खेडकर, अरविंद सोनटक्के, संतोष जिरेसाळ, मंगल कोकाटे, सविता भापकर, अजय भंडारी, मुकुंद लोहिया, रामनाथ बंग, मोदक मानूरकर, अ‍ॅड. दिनकर पालवे यांनी केली.

भैय्या इजारे, भारती असलकर, देवा पवार, सीताराम बोरुडे, चांद मनियार, राहुल कोठारी, मोदक मानूरकर, दिलीप गटागट, राजेंद्र गुगळे, राजेंद्र कोटकर, जमीर आतार, योगेश रासने, परवेज मनियार, राजेंद्र म्हस्के उपस्थित होते. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यावर मूक मोर्चा नेऊन पोलिसांचा निषेध व्यक्त केला. सूत्रसंचालन मुकुंद गर्जे यांनी केले.

राजकीय मंडळींना पोलिस टार्गेट करून गुन्ह्यात टाकू, तो गुन्हा दाखल करू, अशी धमकी देतात. मात्र, ज्यांच्यावर भरमसाठ गुन्हे आहेत, चोर्‍या करतात, असे उथळ माथ्याने फिरतात. त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही.

                                                                             – गोकुळ दौंड

तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. सर्वसामान्य, व्यापारी दहशतीखाली असून गुन्हेगारीला आवरा अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढू.

                                                                      – शिवशंकर राजळे

नवे आणि जुन्या बसस्थानक परिसरात चोरीच्या घटना सातत्याने घडत असून, शहरातील प्रमुख रस्त्यांवर लुटीचे प्रकार घडत आहे. 24 तास पोलिसांची गस्त ठेवावी, तसेच पोलिसांनी गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांसोबत उठ बस करू नये.

अमोल गर्जे

तालुक्यात गुन्हेगारी वाढली असून रस्तालूट, घरफोड्या, फसवणूक, पाकीटमारी, खंडणीखोर आणि गावगुंडांचा उद्रेक झाला आहे. कानून के हात बहुत लंबे होते है.. या म्हणीप्रमाणे साहेब हात लंबे करा. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कोण?, त्यांचे कुठे धंदे आहेत, हे सर्व पोलिसांना माहित आहे. अ‍ॅक्शन मोडमध्ये या आणि करवाई करा. चिंतामणी यांच्यावरील हल्ल्याचा प्रकार हा निंदनीय असून याचाही तपास त्वरित लावावा.

                                                              – अ‍ॅड. प्रताप ढाकणे

लोकांमध्ये पोलिसांविषयी तीव्र नाराजी आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत. शहरातील सराफ व्यावसायिक चिंतामणी यांच्यावर झालेला हल्ल्याचा तीव्र निषेध.आमदार मोनिका राजळे यांनी यात लक्ष घातले आहे. पोलिसांनी लवकर या घटनेचा तपास लावावा.
                                                                        – राहुल राजळे

कायमस्वरूपी लुटमारी, चोर्‍या व हल्ले आता थांबवा. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकजूट ठेवून गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस दलावर दबाव आणावा. गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. गुन्हेगारी, पोलिस संख्याबळ पाहता तालुक्याला त्वरित दोन पोलिस ठाणी नव्याने द्यावीत.

                                                                         – अभय आव्हाड

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news