नगर तालुका : एमआयडीसीसाठी जमिनी अनावश्यक; आ. प्राजक्त तनपुरे यांची माहिती

नगर तालुका : एमआयडीसीसाठी जमिनी अनावश्यक; आ. प्राजक्त तनपुरे यांची माहिती
Published on
Updated on

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : वडगाव गुप्ता व पिंपळगाव माळवी येथील अधिसूचनेच्या अनुसूचित उल्लेखिलेले क्षेत्र नगर एमआयडीसीच्या विकासासाठी आवश्यक नाही, असे राज्य शासनाचे मत झाले आहे. पोटकलम (3) कलम 2. खंड (ग) अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र जनरल नलसिला (1904) या संदर्भ महाराष्ट्र शासन याद्वारे खालील उल्लेख केलेल्या या गोष्टी झाल्या आहेत का, या गोष्टी करायच्या आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 व प्रकरण सहा दिनांक 3 मार्च 2023 पासून करीत आहे. आणि सदर क्षेत्र हे जाहीर केलेल्या औद्योगिक क्षेत्राचा (नगर एम आय डी सी) चा भाग राहणार नाही. राज्यपालांच्या आदेशानुसार किरण जाधव, शासनाचे अवर सचिवांनी अधिसूचना काढल्याची माहिती आमदार तनपुरे ह्यांनी दिली.

वडगाव गुप्ता व पिंपळगाव माळवी येथील 461.74 हेक्टर क्षेत्र विना अधिसूचित करण्यासाठी सह मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा 24 सप्टेंबर 2021 रोजी स्थळ पाहणी दौरा पार पडला. नगर तालुक्यातील या दोन्ही गावांचा हा जिव्हाळ्याचा विषय होता. यासंदर्भात अनेक शेतकरी अकरा वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करीत होते. या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन आमदार तनपुरे यानी शेतकर्‍यांना न्याय देण्याचा विडा उचलला होता.

त्या अनुषंगाने मंत्रालयात तत्कालीन मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तत्कालीन उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे व विद्यमान उद्योग मंत्री उदय सामंत ह्यांचीही भेट घेऊन याबाबत पाठपुरावा केला. याबाबतच्या बैठकीत सदर क्षेत्र विना अधिसूचित करण्यासाठी हाय पावर कमिटी नेमण्याचा निर्णय झाला. याला अनुसरून हाय पावर कमिटीचा पाहणी दौरा पार पडला.

गेल्या दहा अकरा वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार तनपुरे यांचा पुढाकार कामी आला. त्यांच्या तनपुरेच्या प्रयत्नाने नवसंजीवनी मिळाल्याचं समाधान शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर पाहायला मिळाले. रघुनाथ झिने, रामनाथ झिने, जालिंदर गुंड, मनोज लहारे, अप्पा जाधव, प्रकाश डोंगरे, जालिंदर डोंगरे, सुभाष ढेपे, विजय डोंगरे आदींनीे आभार मानले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news