बोधेगाव : ‘केदारेश्वर’च्या गळीत हंगामाची सांगता

बोधेगाव : ‘केदारेश्वर’च्या गळीत हंगामाची सांगता
Published on
Updated on

बोधेगाव; पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योद्घा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याच्या सन 22-23 च्या गळीत हंगामाची शनिवारी सांगता झाली. कारखान्याने 143 दिवसांत 4 लाख 4 हजार 700 मेट्रिकटन उसाचे गाळप केले.
ज्येष्ठ संचालक सुरेशचंद्र होळकर, बन्नोमाँ यात्रा पंच कमेटीचे अध्यक्ष कुंडलिक घोरतळे, उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट, सुभाष खंडागळे, सतीश गव्हाणे, विठ्ठल अभंग, रणजित घुगे, दहिफळे गुरुजी, शेषेराव बटुळे आदींच्या हस्ते विधिवत पूजा करून गव्हाण बंद करण्यात आली.

कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार घोळवे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक बबनराव ढाकणे व अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीचा गळीत हंगाम यशस्वी पार पडला. सर्वांच्या सहकार्याने 4 लाख 4 हजार 700 मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नोंदणी झालेल्या व बिगर नोंदीच्या संपूर्ण उसाचे गाळप केले. शेतकर्‍यांच्या उसाचे पेमेंट वेळेवर बँकेत वर्ग केले जात आहे.

यावेळी मुख्य शेतकी अधिकारी अभिमन्यू विखे, मुख्य आभियंता प्रवीण काळुसे, मुख्य रसायनक पुंडलिक सांगळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी पोपट केदार, लिगल ऑफिसर शरद सोनवणे, मुख्य वित्त अधिकारी तीर्थराज घुंगरड, केनयार्ड सुपरवायझर किसन पोपळे पर्चेस आधिकारी तुकाराम वारे उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news