नगर : कबड्डीला आता चांगले ग्लॅमर..! पद्मश्री पोपटराव पवार

नगर : कबड्डीला आता चांगले ग्लॅमर..! पद्मश्री पोपटराव पवार

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर शहरात 70 वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाची संधी नगरला मिळाली आहे. ही नगरच्या क्रीडा क्षेत्रासाठी चांगली गोष्ट असून, प्रो-लीगमुळे मातील खेळ असणार्‍या कबड्डी स्पर्धेला आता चांगलेच ग्लॅमरआले आहे. यामुळे या स्पर्धेत खेळलेल्या अनेक कबड्डीपटूंचा खेळा पाहण्याची संधी नगरकरांना मिळाणार आहे, असे प्रतिपादन आयोजन समितीचे अध्यक्ष तथा पद्मश्री पोपटराव पवार केले.  महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा हौशी कब्बडी संघटनेतर्फे 70 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन 27 ते 30 दरम्यान वाडिया पार्क क्रीडा संकुलच्या मैदानावर करण्यात येणार आहे. प्रथगच राज्य निवड चाचणी मॅटवर खेळविण्यात येणार आहे. तसेच, प्रीमियर लीगच्या धर्तीवर या स्पर्धेचे आयोजन केले. यामुळे नगरमधील खेळाडू, कबड्डीपटू, क्रीडाप्रेमींना एक मेजवानी ठणार आहे, असे स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष पदमश्री पवार यांनी सांगितले.

प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन अहमदनगर जिल्हा हौशी संघटनेनेने यशस्वी केले होते. यानंतर सलग दुसर्‍यांदा राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी राज्य संघटनेने नगरवर सोपवली आहे.
आयोजन समितीत राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, महापौर रोहिणी शेंडगे, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी जल संधारण मंत्री शंकरराव गडाख, नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे, माजी राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, आमदार राम शिंदे, आमदार रोहित पवार, आमदार लहू कानडे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार सुधीर तांबे, खजिनदार प्रकाश बोरूडे आदींचा सहमावेश आहे. यावेळी सहसचिव विजयसिंह मिस्कीन, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे आदी उपस्थित होते.

सकाळ -संध्याकाळच्या सत्रात स्पर्धा

27 ते 30 दरम्यान राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू, प्रो -कबड्डी लीगच्या खेळाडूंसह 600 खेळाडू, 100 प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि पंचपदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात ही स्पर्धा होणार आहे. अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेने स्थापनेपासून आतापर्यंत किशोर कुमार आणि वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन यशस्वी केले आहे. याद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील तरूण खेळाडूंना प्रोत्साहन आणि नामांकीत खेळाडू, संघाचा खेळ पाहण्याची संधी मिळते. संघटनेने आतापर्यंत अनेक विद्यापीठ राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविले आहेत.

गदई, खाटिक, अस्लमचा खेळ पाहण्याची संधी

नगर आणि राज्य संघाचा कर्णधार शंकर गदई, राहुल खाटिक यांनी नुकत्याच हरियाणा आणि अहमदाबाद येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धामध्ये राज्य संघात प्रतिनिधित्त्व केले होते. जिल्हा संघातील खेळाडू वेगवेगळ्या प्रो कबड्डी संघांत नगरचे प्रतिनिधित्त्व करत आहेत, अशी माहिती अध्यक्ष नीलेश लंके आणि शशिकांत गाडे यांनी दिली आहे.

10 हजार प्रेक्षकांसाठी आकर्षक प्रेक्षक गॅलरी

भव्य एलईडी वॉलसह आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त, असा 10 हजार प्रेक्षक संख्या सामावू शकेल इतक्या क्षमतेचा आकर्षक प्रेक्षक गॅलरी असणार आहे. स्पर्धेदरम्यान चार दिवस एलईडी स्क्रीनवर स्पर्धा पाहण्याची सोय असून, मैदानावर दोन फूट बाय 600 फुटाची चौकोनी एलईडी स्क्रीनची पट्टी असणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news